रशियाच्या रस्त्यांवर साडी नेसून फिरतेय तापसी पन्नू; सोशल मीडियावर रंगलीये चांगलीच चर्चा


हिंदी सिनेसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्रींनी यश मिळवले आहे. इंडस्ट्रीबाहेरून येऊनही काही अभिनेत्रींनी त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर या क्षेत्रात नाव कमावले आहे. यातलेच एक नाव म्हणजे तापसी पन्नू. तापसीने तिच्या अभिनयाच्या ताकदीच्या जोरावर समीक्षकांसोबतच प्रेक्षकांचीही वाहवा मिळवली. कमर्शियलसोबतच तापसी मुख्यतः पठडीबाहेरील सिनेमे करण्यासाठी ओळखली जाते.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी तापसी नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या तापसी तिच्या सोशल मीडियावरील एका फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सध्या तापसी रशिया फिरत असून सध्या तिचा मुक्काम सेंट पीटर्सबर्गमध्ये आहे. येथे फिरताना तापसीने चक्क वेस्टर्न आऊटफीट ऐवजी साडी नेसली असून, त्यावर स्नीकर्स घालून ती पीटर्सबर्गमधील रस्त्यांवर मस्तपैकी भटकत आहे. याचे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर तापसीच्या या हटके लुकची जोरदार चर्चा  सुरू आहे.

यात तिने मोतिया रंगाची साडी त्यावर निळ्या रंगाचा ब्लाऊज, डोळ्यांवर काळा गॉगल आणि पायात स्निकर्स शूज घातले आहेत. तापसीने या हटके आणि आकर्षक स्टाइलमधील फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करताना लिहिले, ‘या शहरातील गल्ल्या खूपच सुंदर आहेत. रात्रीच्या जेवणाला उशीर झाला आहे पळा…’ यासोबतच तिने #SaintPetersburg # Russia #TapcTravels’ हे हॅशटॅगही दिले आहेत.

शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत तापसी आणि तिची बहिण शगुन या दोघी रशियामध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे. तापसीने या सुट्यांचे काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहे. या फोटोंमध्ये ती रशियामधील रस्त्यांवरून सायकल चालवताना दिसत आहे, तर कधी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये बसून कॉफीचा आस्वाद घेताना दिसत आहे. रशियामधील काही ठिकाणांना भेटी देताना तापसीने साडी परिधान केली आहे.

तापसीच्या या फोटोना चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीही लाईक्स करत असून कमेंट्स करत आहेत. लवकरच तापसीचा ‘हसीन दिलरुबा’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर २ जुलैला रिलीज होणार आहे. या सिनेमात तापसी अभिनेता विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणेसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तापसी ‘रश्मी रॉकेट’, ‘लूप लपेटा’ या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गायिका बिली ईलिशला आशियायी लोकांची खिल्ली उडवणे पडले महागात; पोस्ट शेअर करत मागावी लागली माफी

-जेव्हा बिग बींनी नाईलाजाने बांधली होती शर्टाची गाठ; फॅशन समजून चाहत्यांनीही केली नक्कल, आता सांगितला किस्सा

-‘पाऊस, निसर्ग आणि मी…’, म्हणत चिखलात चालताना दिसली मराठमोळी प्राजक्ता माळी


Leave A Reply

Your email address will not be published.