Friday, July 5, 2024

गुणी मुलगी! आपल्या वडिलांची ‘ही’ इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रीति झिंटाने खरेदी केली होती आयपीएल टीम

बॉलिवूडची नामांकित अभिनेत्री प्रीति झिंटा हिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. इतकेच नाही, तर नव्वदच्या दशकात प्रीति बॉलिवूडची सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री बनली होती. प्रीति तिचे आई- वडील आणि 2 भावांसोबत शिमला येथे राहत होती. तिचे वडील दुर्गानंद हे एक लष्करी अधिकारी होते, ज्यांना शिमला येथे एक क्रीडा क्लब बनवायची ईच्छा नेहमीच होती. जेणेकरुन देशातील तरुणांना खेळाकडे प्रोत्साहित केले जावे. या स्वप्नाचा उल्लेख ते आपली मुलगी प्रीति झिंटाकडे अनेक वेळा करत असत.

मात्र, प्रीति झिंटाच्या वडिलांची ही इच्छा अपूर्णच राहिली कारण, प्रीति अवघ्या 13 वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा अपघात झाला होता. ज्यामध्ये प्रीतिच्या वडिलांचे निधन झाले आणि तिची आई जवळजवळ 2 वर्षे अंथरुणावर राहिली. माध्यमांतील वृत्तानुसार, आई-वडिलांच्या अपघातावेळी सर्व जबाबदारी प्रीतिच्या खांद्यावर येऊन पडली. कारण ती भावंडांमध्ये सर्वात मोठी होती. मोठी झाल्यावर तिने प्रथम मॉडेलिंगच्या जगात पाऊल ठेवले आणि नंतर चित्रपटांमध्ये प्रवेश केला. शाहरुख खानसोबत ‘दिल से’ चित्रपटात काम करून तिने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात केली, त्यानंतर प्रीतिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

या चित्रपटानंतर, प्रीति झिंटाने एकामागून एक अनेक जबरदस्त चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रेक्षकांच्या हृदयात आपली खास ओळख निर्माण केली. सुपरस्टार झाल्यानंतरही प्रीति आपल्या वडिलांची इच्छा विसरली नाही. त्याच वेळी, आयपीएल सुरू होत असताना तिने आपल्या वडिलांची ही अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा विचार केला आणि आयपीएलमध्ये एक संघ विकत घेतला. भलेही ती क्रीडा क्लबची मालकीण नाही, परंतु क्रीडा संघाची मालकीण नक्की ठरली.

प्रीति झिंटाने 1998 मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. तेव्हापासून प्रीतिने बॉलिवूडला सातत्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिच्या प्रमुख चित्रपटांमध्ये ‘सोल्जर’, ‘क्या कहना’, ‘कल हो ना हो’, ‘सलाम नमस्ते’, ‘वीर जारा’, ‘संघर्ष’ या चित्रपटांचा समावेश आहे.(bollywood actress preity zinta buy ipl team because of this person)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रेखाच्या मांडीवर दिसणारी ही चिमुरडी आहे तरी काेण? आज आहे बाॅलिवूडची स्टार

‘सलमान खानमुळेच माझी आई…’ म्हणत राखी सावंतच्या भावाने मानले दबंग खानचे आभार

हे देखील वाचा