Saturday, April 20, 2024

रेखाच्या मांडीवर दिसणारी ही चिमुरडी आहे तरी काेण? आज आहे बाॅलिवूडची स्टार

बॉलिवूड स्टार्सशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. अशा परिस्थितीत सोशल मीडियाच्या माध्यमातून ते स्टार्सशी संबंधित प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवून असतात. अलीकडेच गेल्या काही दिवसांपासून स्टार्सचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अशातच आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखा हिच्या मांडीवर एका लहान मुलगी बसलेली असतानाचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो समोर आल्यापासून सर्वजण मुलीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये रेखा (rekha) बाळाला हातात घेऊन कॅमेराकडे हसताना दिसत आहे. तर लोक रेखाच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत, पण त्यांना मुलीला ओळखणे थोडे अवघड होत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही या मुलीला ओळखू शकत नसाल, तर आम्ही तुम्हाला सांगताे की, ही अभिनेत्री कोण आहे? रेखाच्या मांडीवर बसलेली ही मुलगी दुसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आहे.

फाेटाेत रेखा पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यासोबत तिने लाल लिपस्टिक आणि केस बांधले आहेत, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. याशिवाय अनन्या पांडेही निळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. या फोटोवर लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. काहींना अनन्याला ओळखण्यात यश आले, तर काही अभिनेत्रीला ओळखण्यासाठी धडपडत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ???????? (@ananyapanday)

दुसरीकडे, अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ती गेल्या वर्षी विजय देवरकोंडासोबत पॅन इंडिया चित्रपट ‘लिगर’मध्ये दिसली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्याच वेळी, ती आता आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये दिसणार आहे, जो या वर्षी जून किंवा जुलैमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित हाेईल.( did you recognize this little girl seen in bollywood actress rekha lap today she has become a mega star )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राज कपूरांनी संधी देऊनही मागच्या दारातून हेमा मालिनीने ठोकली होती धूम! तरीही सिनेमा ठरला सुपरहिट

बाबा सिद्दीकीच्या पार्टीत पलकच्या रिव्हिलिंग ड्रेसवर संतापले नेटकरी; म्हणाले, “तु इफ्तारसाठी आली की आयटम साँगसाठी?”

हे देखील वाचा