बॉलिवूडमध्ये अनेक चांगले- वाईट किस्से घडले आहेत आणि घडत असतात. अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते यांच्या अफेयरच्या चर्चांचा तर सपाटाच लागलेला असतो. यातील बरेच असे अफेयर आहेत, ज्यांच्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचा विरोध होता. त्यातीलच एक म्हणजे अफेयर म्हणजे अभिनेत्री प्रिया राजवंश आणि चेतन आनंद यांचे. त्यांचे हे नाते प्रियाच्या जीवावर बेतले होते. प्रियाच्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात जितक्या सुंदर पद्धतीने झाली होती, त्याचा अंतही तितक्याच भयानक पद्धतीने झाला होता. चला तर मग आज याबद्दल आपण जाणून घेऊया…
चेतन यांनीच केले होते बॉलिवूडमध्ये लाँच
आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया राजवंश यांचे आयुष्य कोणत्याही चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा कमी नव्हती. प्रिया राजवंश यांना सुपरस्टार देव आनंद यांचे मोठे भाऊ चेतन आनंद यांनी सन १९६४ साली ‘हकीकत’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये लाँच केले होते.
प्रियाला भेटण्यापूर्वी कुटुंबापासून राहायचे दूर
चेतन आनंद हे आपल्या काळातील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक होते. असे म्हटले जाते की, प्रिया आणि चेतन हे एकमेकांवर खूप प्रेम करायचे. प्रियाने जितक्या चित्रपटांमध्ये काम केले होते, त्या सर्व चित्रपटांची निर्मिती चेतन यांनी केली होती. चेतन यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, प्रियाला भेटण्यापूर्वी ते आपल्या कुटुंबापासून दूर राहत असायचे.
चेतन शर्मा यांच्या मुलांनी केली प्रिया राजवंश यांची हत्या
माध्यमांतील वृत्तानुसार, चेतन आनंद यांना दोन मुलं होती. त्यांचे नाव केतन आनंद आणि विवेक आनंद होते. ते चेतन यांच्यासोबतच सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायचे. विशेष म्हणजे ते दोघेही प्रिया राजवंश यांचा तिरस्कार करायचे. असे म्हटले जाते की, सन १९९७ मध्ये चेतन आनंद यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीबद्दल माहिती पडले, तेव्हा चेतन यांनी आपली भरपूर संपत्ती प्रिया राजवंशच्या नावावर केल्याचे उघडकीस आले होते. जुहूच्या रुईया पार्क येथील समुद्रकिनाऱ्यावरील बंगल्याचा काही भाग प्रिया यांना, तसेच केतन आणि विवेकला मिळाला होता.
सन २००० साली प्रियाची तिच्या बंगल्यात हत्या झाल्याचे उघडकीस आले होते आणि पोलिसांनी केतन आणि विवेक यांच्यासह त्यांचे कर्मचारी माला चौधरी आणि अशोक चिन्नास्वामी यांच्यावर तिच्या हत्येचा आरोप लावला होता. दोन वर्षांच्या चाचणीनंतर या चौघांनाही या गुन्ह्यात दोषी ठरविण्यात आले आणि प्रियाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
प्रिया यांनी ‘हीर रांझा’, ‘हिंदुस्तान की कसम’, ‘हँसते जखम’, ‘साहेब बहादुर’, ‘कुदरत’, ‘हाथों की लकीरें’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-