Tuesday, June 18, 2024

पैसे कमावण्यासाठी विकायचे चहा, पहिल्या पत्नीसोबत केले होते दुसऱ्यांदा लग्न; वाचा ‘अन्नू कपूर’ यांचा संघर्षमय प्रवास

‘वाढदिवस’… हा महिना वाढदिवसांंनी भरलेला आहे. अनेक कलाकार या महिन्यात आपला वाढदिवस साजरा करत आहेत. त्यामध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्याचा समावेश आहे. ते अभिनेते इतर कोणी नसून ‘जॉली एलएलबी 2‘, ‘ड्रीमगर्ल‘, ‘ऐतराज‘, ‘खुदा हाफिज‘ आणि ‘विकी डोनर‘ अशा हिट चित्रपटात आपल्या भूमिकेने सर्वांच्या मनात स्थान निर्माण करणारे ‘अन्नू कपूर’ हे आहेत. अन्नू कपूर आज आपला 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज त्यांच्या जन्मदिनी आपण त्यांच्या कारकीर्दीबद्दल जाणून घेणार आहोत.

बनायचे होते आएएस अधिकारी
अन्नू कपूर यांचा जन्म 20 फेब्रुवारी, 1956 रोजी भोपाळमध्ये झाला होता. अन्नू कपूर यांचे वडील मदनलाल एक थिएटर कंपनी चालवत होते, तर त्यांची आई शिक्षिका होती. त्यांच्या कुटुंबाने खूपच कठीण काळाचा सामना केला आहे. अन्नू कपूर यांच्या घरात आर्थिक समस्या असल्यामुळे त्यांना आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यांची आई 40 रुपये पगारावर शाळेत शिकवायच्या. घरातील वाईट परिस्थितीतमुळे पैसे कमावण्यासाठी अन्नू कपूर चहापासून ते चूर्णापर्यंत सर्व काही विकायचे. अन्नू यांना आएएस अधिकारी बनायचे होते. परंतु शिक्षण पूर्ण न झाल्याने त्यांना आयएएस अधिकारी बनता आले नाही.

काही काळानंतर त्यांनी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये ऍडमिशन घेतले. इथे एका नाटकादरम्यान त्यांनी 23 वर्षांच्या वयात 70 वर्षांच्या वयस्कर व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका शाम बेनेगल यांना खूपच आवडली होती. यानंतर त्यांना सन 1983 मध्ये शाम बेनेगल दिग्दर्शित ‘मंडी’ चित्रपटाची ऑफर मिळाली. त्यांच्या या चित्रपटातील अभिनयाची खूप प्रशंसा करण्यात आली. त्यानंतर बॉलिवूडमध्ये त्यांना सन  1984 मध्ये गिरीश कर्नाड यांच्या ‘उत्सव’ चित्रपटातून ओळख मिळाली होती.

भारतीय टेलिव्हिजन उद्योगाचा चर्चित चेहरा
अन्नू कपूर हे भारतीय टेलिव्हिजन उद्योगाचाही एक चर्चित चेहरा राहिले आहेत. त्यांनी अनेक शो होस्ट केले आहेत. त्यांचे सादरीकरण आणि बोलण्याची शैली मंत्रमुग्ध करणारी आहे. तुम्हाला 90च्या दशकातील ‘अंताक्षरी’ शो आठवतो का?, होहो तोच तो… अन्नू कपूर हा शो होस्ट करायचे. त्यावेळी सर्वाधिक पसंत केला जाणारा शो होता. अन्नू कपूर यांनी अभिनय आणि होस्टिंगव्यतिरिक्त चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. त्यांनी ‘अभय’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. याव्यतिरिक्त त्यांनी अनेक संगीत शो, भक्ती अल्बम आणि नाटकांचेही दिग्दर्शन केले आहे.

अन्नू कपूर यांच्या बहिणीने केले होते ओम पुरीशी लग्न
अन्नू कपूर यांची बहीण सीमा कपूरने ओम पुरी यांच्याशी लग्न केले होते. परंतु हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघेही वेगळे झाले. ओम पुरी आणि अन्नू कपूर यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. परंतु दोघांमध्येही कधीच मैत्री होऊ शकली नाही. दोघांनी केवळ सह-कलाकार बनून राहिले.

अन्नू कपूर यांचे वैवाहिक जीवन
अन्नू कपूर यांचे वैवाहिक जीवनही खूप रंजक आहे. त्यांनी अनुपमा कपूर यांच्यासोबत 1992 मध्ये लग्न केले होते. परंतु पुढच्याच वर्षी त्यांचा घटस्फोट झाला होता. यानंतर अन्नू कपूर यांनी 1995 मध्ये अरुणिता मुखर्जीसोबत लग्न केले. परंतु 10 वर्षांनी म्हणजेच सन 2005 मध्येच तेदेखील वेगळे झाले. यानंतर पुन्हा एकदा अन्नू कपूर यांनी सन 2008 मध्ये आपली पहिली पत्नी अरुणिता मुखर्जीसोबत लग्न केले.

अरुणिता मुखर्जी यांच्याकडून अन्नू कपूर यांना एक मुलगी, तर अनुपमा कपूर यांच्याकडून त्यांना तीन मुले आहेत. त्यांचे नाव इवाम, कवान आणि माहिर असे आहे.(bollywood actor annu kapoor birthday special lesser known facts about his personal life)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शर्मिला यांचा हिंदी सिनेसृष्टीबद्दल माेठा दावा; म्हणाल्या, ‘अमिताभ बच्चनसाठी खास स्क्रिप्ट…’

‘ट्रोल करणारी आर्मी मुद्दामच आहे’ म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले बॉयकॉट ट्रेंडवर त्यांचे मत

हे देखील वाचा