Saturday, June 29, 2024

प्रियांकाची लेक समुद्रकिनाऱ्यावर दिसली वाळूशी खेळताना, एकदा पाहाच फाेटाे

बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचे देशाबरोबरच परदेशातही प्रचंड चाहते आहेत. ग्लोबल स्टार बनलेल्या प्रियांकाने ‘क्वांटिको’ या अमेरिकन सीरीजमधून पदार्पण केले. आता लवकरच ती ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणाऱ्या ‘सिटाडेल’ या ड्रामा सीरीजमध्ये दिसणार आहे.

प्रियांका चाेप्रा (priyanka chopra) तिच्या प्रोजेक्ट्ससह सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अलीकडेच, प्रियांका तिचा पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत सुट्टीवर आहे, ज्याचे फोटो ती सतत तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिने आपल्या प्रिय व्यक्तीचा सूर्यास्ताचा आनंद लुटतानाचा एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे.

priyanka chopra daughter malti
Photo Courtesy: Instagram/priyankachopra

प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लेक मालतीचा सुंदर फोटो शेअर केले आहे. मालतीचा हा एकच फोटो आहे, ज्यात ती बीचवर वाळूशी खेळताना आणि सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसत आहे. या फोटोवर प्रियांकाचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

या फोटोंमध्ये प्रियांका चोप्राच्या मुलीने विंटर जॅकेट घातले आहे. मात्र, तिच्या इतर फोटोंप्रमाणे प्रियांकाने या फोटोतही तिच्या मुलीचा चेहरा लपवलेला आहे. नाही. इन्स्टा स्टोरीवर हा फोटो शेअर करत प्रियांकाने म्हटले की, ‘दुपार अशीच असावी’. मुलगी मालतीच्या या गोंडस फाेटाेपूर्वी प्रियांकाने आदल्या दिवशी तिचा एक ग्लॅमरस फोटो शेअर करून चाहत्यांची मने जिंकली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

या फोटोंमध्ये प्रियांकाने पांढऱ्या रंगाचा ट्यूब टॉप घातला आहे आणि त्याचवेळी ती तिचे नवीन हेअरकट दाखवताना दिसत आहे. प्रियांकाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले, तर ती बऱ्याच दिवसांनी बॉलिवूड चित्रपट दिसणार असून ‘जी ले जरा’मध्ये आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.(bollywood actress priyanka chopra daughter malti sit at beach enjoying sunset citadel actress shares an adorable photo)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बापरे! तब्बल 72 कोटींची संपत्ती संजू बाबाच्या नावावर करत चाहतीने घेतला अखेरचा श्वास…

अभिनेत्री रेखा यांच्यामुळे आलेल्या दडपणामुळे करिश्मा कपूर ‘जुबेदा’ सिनेमा करण्यासाठी देत होती नकार

हे देखील वाचा