बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रवीना टंडन आजही लोकांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्रींच्या यादीत रवीना टंडनचा समावेश होताे, पण रवीना आणि ट्विंकल खन्ना अशा दोन अभिनेत्री आहेत ज्यांची अनेकदा सोशल मीडियावर तुलना केली जाते. अशातच पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार घडला आहे. रवीना टंडनच्या एका चाहत्याने तिची तुलना अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत केली, ज्यानंतर अभिनेत्रीने त्याला अतिशय मजेशीर उत्तर दिले.
अभिनेत्री रवीना टंडन (raveena tandon) ही बॉलिवूडमधील स्पष्टवक्ते अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीनाला प्रत्येक गोष्ट उघडपणे सांगायला आवडते. अशातच अलीकडे तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टाेरी शेअर केली, ज्यावर तिने लिहिले हाेते की,’तुम्ही मला काहीही विचारू शकता.’ त्यानंतर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत अनेक प्रश्न विचारले आणि अनेक चाहते तिचे कौतुक करताना दिसले. दरम्यान, तिच्या एका चाहत्याने रवीनाला सांगितले की, ‘ती लहानपणापासून रवीना आणि ट्विंकल खन्ना यांच्यात फार गोंधळते. दोघांमध्ये फरक करणे फार कठीण आहे.’
View this post on Instagram
या प्रतिक्रियेवर मजेशीर उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘तुम्ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करा, आम्ही निधी मिळवून देऊ.’ अभिनेत्रीची ही प्रतिक्रिया पाहूण चाहत्यांचे हसू आवरेना झाले. रवीना टंडन साेशल मीडियावर नियमित सक्रिय असून ती तिचे फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग आहे.
रवीना टंडन हिच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘दिलवाले’, ‘लाडला’, ‘दुल्हे राजा’, ‘पथ्थर के फुल’, ‘परदेशी बहु’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे.(bollywood actress raveena tandon react to fans on comparison with actress twinkle khanna said apna cataract ka surgery karwalo)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ कारणामुळे आथिया आणि के एल राहुलच्या लग्नाला सुनील शेट्टीने दिला होकार,जाणून घ्या माहिती
‘…त्या वास्तुला पुन्हा एकदा बिलगले’, म्हणत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने शेअर केल्या शाळेच्या आठवणी