Monday, July 1, 2024

सिंदूर लावून रेखाचा राॅयल फाेटाेशूट, आघाडीची अभिनेत्री कॅटरिना ही म्हणाली…

बाॅलिवूड अभिनेत्री रेखाने नुकतेच वोग मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. फाेटाेंमध्ये रेखा भारतीय पारंपारिक स्टाईल कॅरी करताना दिसत आहे. रेखाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. महत्वाचे म्हणजे एका फाेटाेत रेखाने भांगेत कुंकु लावलेले आहे.

वाेग मॅगझिनसाठी केलेल्या फाेटाेशूटमध्ये रेखा (rekha) भारतीय शैलीतील गोल्डन कलेक्शनमध्ये दिसली आहे. रेखाचा लूक प्रत्येक ड्रेसमध्ये अधिकच फुलत आहे. रेखाने एकूण 6 प्रकारचे वेगवेगळे ड्रेस घालून फाेटाेशूट केले आहे. रेखा प्रत्येक लूकमध्ये खूप वेगळी दिसत आहे. रेखाची ही शैली चाहत्यांना खूप आवडली आहे. रेखाने बॉलिवूडचे प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा याने डिझाइन केलेले ड्रेस परिधान केले आहे. रेखाचा ड्रेस हा अनारकली सूट आहे, ज्यामध्ये ती घूमताना दिसत आहे. मनीष मल्होत्राने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

मनीष मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, ‘हा अनारकली सूट अंगरखा स्टाइल बेस्ड आहे. या सूटची खासियत म्हणजे त्याला एक वेगळा लूक देणारे त्याचे सोनेरी जॅकीट जे कॉन्टेंप्रेरी विंटेज गोल्ड इंब्रॉइडरीने सजलेले आहे.’

रेखाला या ड्रेसमध्ये स्टाईल करताना पाहून चाहत्यांसाेबतच स्टार्सही अवाक् झाले आहेत. या फोटोवर कमेंट करताना कॅटरिनाने लिहिले,’स्टनिंग’, तर वैभवी मर्चेंट या कमेंट करत म्हणाल्या, ‘उफ्फ मनीष.’ एका फाेटाेत रेखाने सोनेरी तांब्या रंगाची महाराष्ट्रीयन शैलीची साडी नेसलेली दिसत आहे. या फोटोत रेखा अप्रतिम दिसत आहे.

रेखाची ही शैली खूपच वेगळी आहे. रेखाची ड्रेस कॅरी करण्याची पद्धत आणि फाेटाेतील तिची ऐटीट्यूड पाहून, टीव्हीवरील डोनल बिश्त देखील स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकले नाहीत. यादरम्यान टीव्ही अभिनेत्री डोनलने रेखाला ‘आयकॉनिक’ म्हटले आहे.

या साेबतच एका फाेटाेशूटमध्ये रेखा मखमली गाऊनमध्ये दिसली. या लाल रंगाच्या ड्रेप गाऊनमध्ये अभिनेत्रीचे साैंदर्य अधिकच खुलले हाेते. दिव्या अग्रवालला रेखाचा हा लूक खूप आवडला आहे.(bollywood actress rekha royal photoshoot for vouge pictures out tv donal bisht to bollywood katrina kaif wondering )

अधिक वाचा-
एकता कपूरने फाडला हाेता स्मृती इराणींचा कॉन्ट्रॅक्ट; वर्षांनंतर केला खुलासा, म्हणाली…
किशाेरवयात तेजस्वीचा झाला हाेता विनयभंग; खुलासा करत म्हणाली,’मी रस्त्यावर एकटी हाेती अन् दोन मुलं…’

हे देखील वाचा