Sunday, March 16, 2025
Home बॉलीवूड BREAKING! रेखा यांना ब्रेक देणाऱ्या निर्मात्याचे निधन; ‘हे’ आहे त्यांच्या मृत्यूचे कारण

BREAKING! रेखा यांना ब्रेक देणाऱ्या निर्मात्याचे निधन; ‘हे’ आहे त्यांच्या मृत्यूचे कारण

बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र, एकेकाळी रेखा यांना चित्रपट सृष्टीतील एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांनी ब्रेक दिला होता. त्यांच नाव कुलजीत पाल होय. कुलजीत पाल यांनी ‘अर्थ’, ‘आज‘, ‘परमात्मा’, ‘वासना’, ‘दो शिकारी‘ आणि ‘आशियाना’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. कुलजीत पाल यांच्या विषयी दु:खद बातमी समोर आली आहे.

कुलजीत पाल (Kuljit Pal) यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. ते अंथरुणाला खिळून होते. शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी कुलजीत पाल अखेरचा श्वास घेतला.

कुलजीत पाल यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12 वाजत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी 29 जून रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. (Kuljit Pal died of a heart attack)

(ही बातमी अपडेट होत आहे.)

अधिक वाचा- 
अभिनेत्री साराच्या ‘या’ मादक फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, नेटकरी झाले तिच्या लुक्सवर फिदा
करिश्मा कपूरने 25 वर्षांपूर्वी आमिर खानसोबत दिला होता जबरदस्त किसिंग सीन, थरथर कापत होती अभिनेत्री

हे देखील वाचा