Sunday, June 23, 2024

आयफा अवॉर्ड शोमध्ये ‘ड्रामा क्वीन’ अन् सारा एकमेकांशी भिडल्या; अभिनेत्री म्हणाली, ‘तुला पाप …’

बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या ‘जरा हटके जरा बचके‘ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. अशात सारा आणि विकी कौशल त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन जाेरदार करत आहेत. या सगळ्यात अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर करून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. काय आहे नेमके व्हिडिओमध्ये? चला जाणून घेऊया…

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सारा अली खान (sara ali khan) आणि राखी सावंत (rakhi sawant) या दोघींनी लाल रंगाचे कपडे घातलेले दिसत आहेत. सारा अली खान बाथरूममधून बाहेर येताच राखी सावंतला धडकते, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि मग काय? दोन्ही अभिनेत्री एकमेकांना सारख्या कपड्यात पाहून हैराण होतात आणि इथूनच दोघांमध्ये कॅट फाईट सुरू होते.

राखी आणि सारा दोघीही दावा करू लागतात की, कोण चांगले दिसत आहे. यादरम्यान दाेघींमध्येही भयंकर युद्ध सुरू होते, ज्यामध्ये सारा राखीला सांगते की, ‘तिला पाप लागेल’. असे म्हणताच दाेघींमध्ये डांस काॅम्पिटीशन सुरू होते. आणि या दाेघीही ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटातील ‘बेबी तुझे पाप लगेगा’ या गाण्यावर डान्स करू लागतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

हा व्हिडिओ शेअर करत साराने लिहिले, “रेड हॉट चिली, जेव्हा सौम्या राखीजींना भेटली.” या व्हिडिओवर दोन्ही अभिनेत्रींच्या चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “किती गोंडस आहे हे”, तर एकाने कमेंट करत लिहिले की, “हे खूप मजेदार आहे”. अशा प्रकरे चाहेत अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (bollywood actress sara ali khan share funny video with rakhi sawant quarreling over same dress while grooving on zara hatke zara bachke song)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
“जेव्हा कागद पेन नसते, तेव्हा काही…” अभिनेत्री केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये उतरली पलक तिवारी; चाहते म्हणाले, ‘आई जास्त हॉट…’

हे देखील वाचा