Tuesday, June 25, 2024

राखी सावंतने धक्का दिला आणि आयफा सोहळ्यात पडत पडत वाचला विकी कौशल, व्हिडिओ झाला व्हायरल

बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक असलेल्या आयफा अवॉर्ड्समध्ये मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलमान खानने आयफा दरम्यानचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो अक्षय कुमारच्या चित्रपटातील सौदा खरा खरा गाण्यावर आपल्या बहिणीसोबत नाचताना दिसत आहे. त्याचदरम्यान विकी कौशलचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये तो राखी सावंतसोबत त्याची पत्नी कतरिना कैफच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

इंटरनॅशनल फिल्म अकादमी अवॉर्ड्स अबू धाबी येथे आयोजित करण्यात आले होते. जेथे जवळ जवळ बॉलीवूडचे सर्व कलाकार उपस्थित होते. यावेळी पुरस्कार सोहळ्याव्यतिरिक्त, बरेच दमदार परफॉर्मन्स देखील पार पडले. यातील एक परफॉर्मन्स विकीचाही होता. विकी इंडस्ट्रीतील सर्वात बिंदास अभिनेत्यांपैकी एक मानला जातो.  तो अभिनेत्री राखी सावंतसोबत ‘शीला की जवानी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

https://twitter.com/scrappinthrough/status/1662669268486610944

यादरम्यान राखीही बॉलिवूड स्टार्ससोबत मस्ती करताना दिसली. राखी तिच्या खास लूकमध्ये या कार्यक्रमात पहायला मिळाला. राखीने विकी कौशकासोबत डान्स केला, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, राखीने विक्की कौशलला जोरदार ठुमका मारला, ज्यामुळे अभिनेत्याचा तोल गेला. राखी आणि विकीच्या या डान्स व्हिडिओला चाहत्यांकडून भरपूर पसंत मिळत आहे.

विकी आणि राखी या व्हिडिओमध्ये भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. या दोघांसोबत साराही डान्स करताना दिसत आहे. दोघेही त्यांच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. सध्या दोघेही त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. (Vicky Kaushal collapsed on stage because of Rakhi Sawant)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
“जास्तीत जास्त वेळ घालवायचा…सोपं नव्हतं…”; ‘आई’ असलेल्या मधुराणी गोखलेची पोस्ट व्हायरल
आलिया भट्टच्या आजोबांची प्रकृती चिंताजनक, आलिया भट्टने रद्द केला ‘हा’ महत्त्वाचा दौरा

हे देखील वाचा