बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीचा एक वेगळाच स्वॅग असतो. एक वेगळी स्टाईल असते. त्यांच्या याचं वेगळ्यापणामुळे त्यांची इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण होत असते. यातीलच तिच्या स्टाईलने आणि अंदाजाने सर्वांना तिच्याकडे आकर्षित करणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सारा अली खान. तिच्या वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडिओने ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. अशातच सारा अली खानचा एक मनमोहक फोटो समोर आला आहे.
सारा अली खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती अत्यंत सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा लेहंगा घातलेला दिसत आहे. तिच्या या फोटोमधील सर्वात जास्त आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे तिच्या गळ्यातील डायमंड नेकलेस. तिने अत्यंत सुंदर नेकलेस घातला आहे. तसेच तिने घातलेले कानातले देखील खूप सुंदर दिसत आहे. तिने केसांची पोनी बांधली आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील आकर्षित करणारे आहेत. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “लाल कमाल, विथ आऊट एनी सवाल.”
तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. तिचे चाहते सातत्याने कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. तिच्या फोटोवर तिचे चाहते हार्ट आणि फायर ईमोजी पोस्ट करत आहेत. (Bollywood actress sara ali khan share her photo on social media)
तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने नुकतेच आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. या चित्रपटात सारा अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुषसोबत दिसणार आहे. तसेच आदित्य धर यांच्या ‘द : इम्मोर्टल ऑफ अश्वत्थामा’ या चित्रपटांत ती विकी कौशलसोबत दिसणार आहे. तसेच तिने ‘कुली नंबर १’, ‘सिंबा’, ‘केदारनाथ’, ‘लव्ह आज कल’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दुःखद! ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री जयंती काळाच्या पडद्याआड; झोपेत असतानाच घेतला त्यांनी अखेरचा श्वास