Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड साठच्या दशकात पहिल्यांदाच ‘बिकिनी गर्ल’ने निर्माण केली हाेती दहशत, निषेधाचे लावले गेलेले पोस्टर

साठच्या दशकात पहिल्यांदाच ‘बिकिनी गर्ल’ने निर्माण केली हाेती दहशत, निषेधाचे लावले गेलेले पोस्टर

60 च्या दशकातही बिकिनी घालण्यावरून गदारोळ व्हायचा आणि आजही होत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर बिकिनी परिधान केलेली अभिनेत्री दुसरी कोणी नसून शर्मिला टागोर आहे. जेव्हा शर्मिला यांनी पहिल्यांदा बिकिनी घातली होती तेव्हा खूप वाद झाला होता. विरोध इतका वाढला हाेता की, त्याची चर्चा संसदेतही झाली हाेती. इतकंच नाहीतर शार्मिला यांना सासूपासून हे प्रकरण लपवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. चला तर जाणून घेऊया पहिल्या बिकिनी गर्लची रंजक गाेष्ट…

आजकाल ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घालण्यावरून गदारोळ सुरू आहे, पण बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर याही पहिल्यांदाच जेव्हा बिकिनी घालून पडद्यावर आल्या, तेव्हा अशाच वादात सापडल्या हाेत्या. शर्मिला टागोर त्यांच्या लूक आणि स्टाइलमुळे खूप चर्चेत होत्या. शर्मिला अश्या अभिनेत्री आहे, ज्यांनी पहिल्यांदा टू पीस बिकिनीमध्ये बोल्ड फोटोशूट करून सर्वांना चकित केले. 1966 मध्ये या अभिनेत्रीने फिल्मफेअर मासिकासाठी फोटोशूट करून खळबळ उडवून दिली होती.

काहींना शर्मिला यांची बोल्ड स्टाइल आवडली, तर काहींनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. यानंतर शर्मिला जेव्हा 1967 मध्ये ‘अॅन इव्हनिंग इन पॅरिस’ या चित्रपटात स्विमसूट घालून पडद्यावर आल्या, तेव्हा बराच गदारोळ झाला होता. पण ‘आमने सामना’ या चित्रपटात शर्मिला पुन्हा स्विमसूटमध्ये दिसल्यावर हा वाद इतका वाढला की, त्यांच्या निषेधार्थ रस्त्यावर पोस्टर लावण्यात आले. शर्मिला टागोर यांच्या पेहरावाचा जाहीर निषेध असा झाला की, हे प्रकरण संसदेतही पोहोचले.

शर्मिला या चित्रपटांमध्ये काम करत असताना त्या क्रिकेटर आणि पतौडीचे नवाब मन्सूर अली खान यांना डेट करत होत्या. शर्मिला यांच्या स्विमसूटचे पोस्टर रस्त्यांवर लावलेले होते आणि त्याचवेळी मन्सूरची आई त्यांना भेटायला मुंबईत येत होती. याबाबतची माहिती मिळताच अभिनेत्री घाबरली की, हे सासू-सासऱ्यांना दिसायला नकाे. शर्मिला यांनी निर्मात्याला फोन करून संपूर्ण शहरातून पोस्टर हटवण्याची विनंती केली आणि रात्रीतून पोस्टर हटवण्यात आले. अशाप्रकारे शर्मिला यांचा बिकिनीचा वाद सासू-सासऱ्यांसमोर येऊ शकला नाही. (bollywood actress sharmila tagore first actress who wears bikini in 1960 in bollywood movie faces mass protest across india actress deepika padukone)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कैकला सत्यनारायन अंतिमक्षणी दर्शनास पोहोचले चिरंजीवी आणि पवण कल्यान, भावूक करणारे फोटो व्हायरल

रिअल लाईफ हिरो! तस्करीमध्ये अडकलेल्या तब्बल 128 महिलांना सुनील शेट्टीने दिले जीवनदान

हे देखील वाचा