बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या लग्नाला 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. काही काळापासून त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. मात्र, सर्व कठीण परिस्थितीतही शिल्पा पती राजच्या पाठीशी उभी राहिली. इतकंच नाही तर लग्नाच्या 13 व्या वाढदिवसानिमित्त शिल्पाने एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करून पती राज कुंद्राचे वैवाहिक जीवन आनंदी केल्याबद्दल आभार मानले आहेत.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) हिने पती राज कुंद्रा ( raj kundra) याच्यासोबतचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राज आणि शिल्पाच्या सर्व फोटोंचे कोलाज आहेत. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “13 वर्षे, कुकी, व्वा (आणि मोजत नाही). माझ्यासाेबत हा प्रवास शेअर केल्याबद्दल आणि तो इतका सुंदर बनवल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आणि मी, आम्ही… एवढीच गरज आहे. हॅप्पी एनिवर्सरी टू अस कुकी.”
View this post on Instagram
बहीण शमिता शेट्टी, संजय कपूर, बिपाशा बसू, सोफी चौधरी, नीलम कोठारी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या पोस्टवर शिल्पा शेट्टीचे अभिनंदन केले, तर एका चाहत्याने तिला तिचा 25 वा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, “हे वर्ष कठीण आहे पण तितकेच सुंदर आहे. तुम्ही केलेले मॅनेज काैतुकास्पद आहे आणि 25 वा लग्नाचा वाढदिवसही तुम्ही तितक्याच प्रेमाने साजरा कराल अशी अपेक्षा आहे.”
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांचे पोर्नोग्राफी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही काळापूर्वी राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात चर्चेत आला होता. मात्र, हे प्रकरण थांबले होते. अशातच आता पुन्हा एकदा राज अडचणीत आला आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा, पूनम पांडे आणि इतरांविरुद्ध अश्लील मजकूर तयार करून OTT प्लॅटफॉर्मवर दाखवल्याबद्दल 450 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. (bollywood shilpa shetty and raj kundra celebrated 13 marriage anniversary actress shares beautiful video)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
उर्वशी रौतेलाने देवासमोर जाेडले हात अन् चाहत्यांना विचारले, ‘मी काय मागू’?
पती-पत्नीचं नातं संपलं! सात जन्माच्या शपथा खाऊनही मोडला मानसी नाईक अन् प्रदीप खरेराचा संसार?