Tuesday, May 21, 2024

‘आता काय तोंडात…’, फोटो काढायला आलेल्या फोटोग्राफर्सवर जोरात भडकली शिल्पा शेट्टी, पाहा व्हिडिओ

बॉलिवूडची ‘फिटनेस क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी होय. शिल्पा ही नेहमीच तिच्या सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ती तिच्या व्हिडिओंमुळे सर्वांचे लक्ष घेते. मात्र, यावेळी ती तिच्या व्हिडिओमुळे नाही, तर फोटोग्राफर्सला झापल्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी असे काय झाले, ज्यामुळे शिल्पा शेट्टी फोटोग्राफर्सवर संतापली? चला जाणून घेऊया…

नेमकं काय घडलं?
झाले असे की, शिल्पा शेट्टी नुकतीच मुंबईत स्पॉट झाली. यादरम्यान तिचा फोटोग्राफर्सवरील राग अनावर झाला. खरं तर, यावेळी फोटोग्राफर्सचा कॅमेरा तिच्या तोंडाला लागता-लागता वाचला होता. त्यावेळी तिने फोटोग्राफरवर आगपाखड केली. बुधवारी (दि. 16 नोव्हेंबर) शिल्पा मुंबईतील एका इमारतीच्या बाहेर पडताना दिसली. फोटोग्राफर्सने तिच्याकडे फोटो काढण्याची मागणी केली.

शिल्पाची आगपाखड
अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच्या अंदाजात होती. यादरम्यान फोटोग्राफरच्या एका कृत्यामुळे ती नाराज झाली. यावेळी तिने फोटोग्राफरवर “तोंडात घुसून फोटो घेणार का?” असे म्हणत आगपाखड केली. यानंतर आजूबाजूचे फोटोग्राफर्सही सावध झाले. यावेळी शिल्पा खूपच घाईत होती. ती यावेळी ऑफ ड्यूटी लूकमध्ये होती. तिने चंदेरी रंगाचे जॉगर्स आणि काळ्या रंगाचा टॉप परिधान केला होता. तसेच, तिने सनग्लासेस परिधान केले होते. यावेळी तिच्यासोबत एक बॅगही होती. कॅमेऱ्याकडे पाहून तिने स्मितहास्यही दिले होते. यावेळी ती गाडीत बसत होती, तेव्हा तिने फोटोग्राफर्सकडे पाहून हातही हलवला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शिल्पा शेट्टीचा सिनेमा
शिल्पा ही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने ‘अपने’, ‘जानवर’, ‘आक्रोश’ यांसारख्या सिनेमात काम केले आहे. शिल्पा शेट्टी हिच्या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर ती लवकर रोहित शेट्टी (Rohit Shetty) याच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. हे तिचे ओटीटी पदार्पण असेल. यामध्ये तिच्याव्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हादेखील दिसणार आहे. (Actress Shilpa Shetty scolds photographers see video what she said)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्दर्शकाच्या ‘त्या’ एका निर्णयाने मोडली होती राजेश खन्ना आणि अमोल पालेकरांची जुनी मैत्री, वाचा सविस्तर
रणबीर अन् आलियाने लेकीचे ठेवले खास नाव, आजी नीतू कपूर झाल्या भावूक

हे देखील वाचा