Thursday, April 3, 2025
Home बॉलीवूड मोहम्मद सिराजच्या कामगिरीवर ‘ही’ अभिनेत्री झाली फिदा; म्हणाली, ‘आता सिराजलाच…’

मोहम्मद सिराजच्या कामगिरीवर ‘ही’ अभिनेत्री झाली फिदा; म्हणाली, ‘आता सिराजलाच…’

भारताने रविवारी श्रीलंकेवर 10 विकेट्सने एकतर्फी विजय नोंदवत आशिया चषक 2023 जिंकले. यामुळे भारताने आठव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 50 धावांत सर्वबाद झाली. मोहम्मद सिराजने या सामन्यात चार विकेट्स घेत श्रीलंकेच्या फलंदाजीचा भुस्सा उडवला.

इशान किशनने 23 धावा आणि शुभमन गिलने 27 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात सिराजच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही (Shraddha Kapoor ) सिराजच्या या कामगिरीवर इन्स्टाग्रामवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने एका फोटोवर कॅप्शनमध्ये लिहिले, “आता सिराजलाच विचारा की या मोकळ्या वेळेचे काय करायचे…”

भारताने 6.1षटकांत लक्ष्याचा जोमाने पाठलाग केला आणि आठव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. सिराजच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. पुढील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकतो अशी अपेक्षा आहे.

श्रद्धा कपूर ही भारतातील एक लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात 2010 मध्ये ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून केली. मात्र, तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी 2’ या चित्रपटातून. या चित्रपटासाठी तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन मिळवले.

‘आशिकी 2’ नंतर श्रद्धाने ‘एक विलन’, ‘ABCD 2’, ‘बागी’, ‘स्ट्री’, ‘साहो’, ‘छिछोरे’ आणि ‘तु झूठी मैं मक्कार’ यासह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने या चित्रपटांमधील आपल्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांचे हृदय जिंकले आहे. यासोबतच अभिनेत्रीकडे तिचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘स्त्री’ आहे जो 2018 मध्ये रिलीज झाला होता, आता तिच्याकडे ‘स्त्री 2’ हा दुसरा भाग आहे जो पुढील वर्षी 2024 मध्ये रिलीज होणार आहे. (Bollywood actress Shraddha Kapoor is impressed with the performance of fast bowler Mohammad Siraj)

अधिक वाचा- 
शिव ठाकरेच्या घरी वर्दीतला गणपती बाप्पाचे दणक्यात आगमन, ‘या’ एका गोष्टीमुळे नेटकरी संतापले
‘…ती जागा हाफ चड्डीची नाही’, गणेश भक्तांच्या ड्रेसकोडवरून अभिनेत्री दीपाली सय्यद भडकल्या

हे देखील वाचा