Friday, December 8, 2023

‘भारतातल्या प्रेक्षकांनो…’, सकर्षण कऱ्हाडेने प्रेक्षकांना केली विनंती, नेटकरी म्हणाले, ‘दादा तुम्ही…’

जसे प्रेक्षक आपल्याला लाडक्या कलाकाराला भरभरून प्रेम देऊन प्रतिसाद देतात तसेच कलाकारही देखील प्रेक्षकांचे मनापासून आभार मानत असतात. प्रसिद्ध मराठी अभिनेता संकर्षण कर्‍हाडे सध्या चर्चेत आला आहे. संकर्षण सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतो. संकर्षण सोशल मीडियावर त्याचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतो. सध्या संकर्षण एक पोस्ट केली आहे जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

संकर्षण (sankarshan karhade) हा एक उत्तम कलाकार आहे. त्याच्या लिखाणाचे, दिग्दर्शनाचे, कवितांचे आणि त्याच्या सूत्रसंचालनाचे लाखोच्याहते आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील अतिशय प्रभावी आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणून संघर्षणला ओळखले जाते. त्याने परभणी सारख्या छोट्या शहरातून येत त्याची मोठी ओळख निर्माण केली आहे. अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करून त्याने त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे.

संकर्षणने पोस्ट करताना लिहिले की, “अमेरिकेला जाऊन येतो. 14 प्रयोगांची मोठी वारी आहे. भारतातल्या प्रेक्षकांना शुभेच्छा आशीर्वाद असू द्या. अमेरिकेतील मराठी रसिक प्रेक्षकांनो..‘नियम व अटी लागू…’ नाटकाला नक्की या. भेटूच..” त्याचीही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. पोस्ट माध्यमातून संघर्षणने भारतीय प्रेक्षकांना एक विनंती केली आहे.

 संकर्षणच्या हा पोस्टवर नेटकर्‍यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “दादा तुम्ही म्हणता जगात जर्मनी आणि भारतात परभणी आहे. मग त्याच परभणीत एक शो ठेवा.” असे म्हणत त्याने संकर्षणकडे गावात नाटकाचा शो ठेवण्याची मागणी केली आहे. तर काही नेटकर्‍यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Sarshan Karhade post on Instagram is in discussion)

अधिक वाचा-
इंडिया आणि भारत वादादरम्यान खिलाडी अक्षय कुमारनं उचलले मोठे पाऊल; म्हणला…
नाद केला पण पुरा केला! शाहरूख खानच्या ‘जवान’ने पहिल्याच दिवशी छापले ‘एवढे’ कोटी

हे देखील वाचा