Monday, April 15, 2024

श्रद्धा कपूर ऑटोरिक्षाने पोहोचली जिममध्ये; युजर्स म्हणाले, ‘डाउन टू अर्थ म्हणजे श्रद्धा’

बाॅलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनयासोबतच तिच्या अप्रतिम स्वभावामुळे लोकांना आवडते. श्रद्धा आपल्या साधेपणाने नेहमीच लोकांची मनं जिंकत असते. अशात पुन्हा एकदा श्रद्धा चांगलीच चर्चेत आली आहे.  खरे तर, श्रद्धा हिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून चाहते थक्क झाले आहेत. काय आहे व्हिडिओमध्ये? चला, जाणून घेऊया…

अभिनेत्री श्रद्धा कपूर (shraddha kapoor) हिचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये ती ऑटोरिक्षातून खाली उतरताना दिसत आहे. यादरम्यान श्रद्धा कपूर जिममध्ये पोहोचली होती आणि तिने ऑटोची मदत घेतल्याचे दिसत आहे. महत्वाचे म्हणजे यावेळी श्रद्धा एकटी बसली नसून तिच्यासाेबत कोणीतरी शेअरिंग करत बसले होते. रिक्षातून खाली उतरल्यानंतर श्रद्धा कपूर जिममध्ये गेली. अशात आता हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडिओवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “सर्वात नम्र अभिनेत्री! डाउन टू अर्थ हा शब्द तिच्यासाठी तयार झाला आहे.”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले की, “श्रद्धेबद्दल आदर, कृपया मराठीतही बोला.” अशात एकाने कमेंट करत लिहिले की, “साधेपणा उत्तम आहे.” अशा अनेक भन्नाट कमेंट अभिनेत्रीच्या व्हिडिओवर येत आहे. सध्या श्रद्धा कपूर तिचा नुकताच रिलीज झालेला ‘तू झुटी मैं मक्कर’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

‘तू झुटी मैं मक्कर’ हा चित्रपट 2023मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटातील रणबीर कपूरसोबत श्रद्धाची जोडी प्रेक्षकांना खुप आवडली. विशेष म्हणजे, श्रद्धा कपूरला ‘आशिकी 2’मधून बॉलिवूडमध्ये बरीच ओळख मिळाली, हा चित्रपट खूप गाजला. यानंतर एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देऊन श्रद्धा कपूरने इंडस्ट्रीत आपले खास स्थान निर्माण केले आहे. (bollywood acteress shraddha kapoor reached gym by auto rickshaw people said down to earth means shraddha )

अधिक वाचा-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा निर्माता असित मोदीविरोधात एफआयआर दाखल, लवकरच होणार अटक?
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा टीझर रिलीज, रणवीर अन् आलिया रंगले एकमेंकाच्या प्रेमात

हे देखील वाचा