Wednesday, January 22, 2025
Home बॉलीवूड ‘प्यार का पंचनामा’ फेम साेनाली सेहगल अडकली विवाह बंधनात, कुत्र्यासाेबत केली राॅयल एन्ट्री

‘प्यार का पंचनामा’ फेम साेनाली सेहगल अडकली विवाह बंधनात, कुत्र्यासाेबत केली राॅयल एन्ट्री

बॉलीवूड अभिनेत्री सोनाली सेहगलने अखेर आपला जीवनसाथी निवडला आहे. अभिनेत्रीने बुधवारी (7 जुन)ला तिचा प्रियकर बिजनेसमॅन आशिष सजनानीसोबत लग्न बंधनात अडकली आहे. अशात सोशल मीडियावर लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यावर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

साेनाली सेहगल (sonali sehgal) हिने या खास प्रसंगी गुलाबी आणि सिल्व्हर रंगाची भारी साडी नेसली होती. यासाेबतच तिने डाेक्यावर पदर ही घेतला हाेता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोनालीच्या लग्नाला अनेक टीव्ही आणि फिल्म स्टार्सनी हजेरी लावली होती,ज्यामध्ये कार्तिक आर्यन ते मंदिरा बेदी यासारख्या दिग्गजाचा समावेश हाेता. मंदिराव्यतिरिक्त अभिनेत्री चाहत खन्नाही सोनालीच्या लग्नात सहभागी झाली होती. यासाेबतच टीव्ही अभिनेता करण व्ही ग्रोवरही त्याच्या पत्नीसोबत दिसला.

लग्नाच्या फोटोंशिवाय अभिनेत्रीच्या मेहंदी सेरेमनीचे काही फोटोही समोर आले आहेत, ज्यात अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Veena Bollywood Mehendi (@veenanagda)

सोनाली सेहगलने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण तिला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. तिने 2011 मध्ये ‘प्यार का पंचनामा’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ती ‘जय मम्मी दी’, ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘नूरानी चेहरा’, ‘सेटर्स’, ‘वेडिंग पुलाव’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. (bollywood actress sonali sehgal tied the knot businessman boyfriend ashesh l sajnani )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दर रविवारी बिग बी अनवाणी पायांनी चाहत्यांचे का करतात अभिवादन? स्वतःच सांगितले कारण
लग्नाशिवाय दुसऱ्यांदा आई हाेणार ‘ही’ अभिनेत्री, युजर्सेने ट्राेल केल्यावर रामपालच्या प्रेयसीने दिले चाेख उत्तर

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा