Sunday, December 3, 2023

दर रविवारी बिग बी अनवाणी पायांनी चाहत्यांचे का करतात अभिवादन? स्वतःच सांगितले कारण

मेगास्टार अमिताभ बच्चन यांना चाहत्यांनी देवाचा दर्जा दिला आहे. फक्त त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक मैलांचा प्रवास करून मायानगरीला पोहोचतात. अशात बिग बी देखील त्यांच्या चाहत्यांना पूर्ण आदर देतात. यामुळेच ते दर रविवारी त्याच्या घराबाहेर चाहत्यांना अभिवादन करायला विसरत नाही. ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. विशेष म्हणजे बिग बी अनवाणीच पायानेच चाहत्यांना भेटतात. काय आहे यामागचे कारण? चला, जाणून घेऊया…

अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ते बाहेर जमलेल्या चाहत्यांचे अभिवादन करताना दिसत आहे. मात्र, या दरम्यान त्यांच्या पायात शूज किंवा चप्पल नाही. याचं कारण स्वत: बिग बींनी कॅप्शनमध्ये दिलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, ‘मला नेहमी विचारले जाते, “अनवाणी पायानी चाहत्यांना कोण भेटायला जाते’? मी त्यांना सांगतो, ‘मी जातो…. तुम्ही अनवाणी पायानी मंदिरात जाता…. त्याचप्रकारे रविवारी येणारे माझे हितचिंतक माझ्यासाठी मंदिरासारखे आहेत!! तुम्हाला यात काही अडचण आहे का!” अभिनेता आपल्या चाहत्यांचा खूप आदर करतात हे बिग बींच्या कॅप्शनवरून स्पष्ट होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “तुमची शब्दांची निवड किती अप्रतिम आहे अमित जी, तुम्ही तुमच्या प्रियजनांना डोक्यावर बसवता. तुमचा हा गुण मन जिंकतो.”, तर आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, “खूपच क्यूट कॅप्शन लिहिले आहे, म्हणूनच तुमच्याबद्दलचा आदर नेहमीच वाढत राहतो.” अशात एका युजरने लिहिले की, “चाहत्यांचा असाच आदर केला पाहिजे.”

अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलयचे झाले, तर बिग बी सध्या ‘सेक्शन 84’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. याशिवाय ते प्रभासच्या प्रोजेक्टमध्येही दिसणार आहे. (bollywood actor amitabh bachchan reveals why he greets his fans barefoot every sunday outside jalsa shares photo on instagram )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बापरे..! अभिनेत्री सुष्मिता सेनने कुणाला मारली मिठी? युझर्स म्हणतायेत ‘ललित मोदीचा पत्ता कट’ – व्हिडिओ

‘आदिपुरुष’च्या ट्रेलर लाँचमध्ये प्रभासने लग्नाबद्दल केला खुलासा; म्हणाला, ‘मी तिरुपतीमध्ये लग्न…’

हे देखील वाचा