Tuesday, September 17, 2024
Home बॉलीवूड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा आई हाेणार ‘ही’ अभिनेत्री, युजर्सेने ट्राेल केल्यावर रामपालच्या प्रेयसीने दिले चाेख उत्तर

लग्नाशिवाय दुसऱ्यांदा आई हाेणार ‘ही’ अभिनेत्री, युजर्सेने ट्राेल केल्यावर रामपालच्या प्रेयसीने दिले चाेख उत्तर

बाॅलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. कारण, अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. खरंतर गॅब्रिएला लग्न न करता दुसऱ्यांदा प्रग्नेंट आहे. अशात अभिनेत्रीने तिचा बेबी बंपसोबतचा फोटोही शेअर केला आहे. मात्र, या सगळ्यात काही चाहत्यांनी या फाेटाेंवर प्रेमाचा वर्षाेव केला आहे, तर काहींनी तिला जाेरादार ट्राेल केले आहे.

ग्रॅब्रएलाने बेबी बंपसाेबत शेअर केले लेटेस्ट फाेटाेशूट
खरे तर, अर्जुन रामपाल (arjun rampal) आणि गॅब्रिएला (gabriella) हिने लग्न केले नाही, पण ते दाेघेही रिलेशनशिपमध्ये असून त्यांच आयुष्य खूप एन्जॉय करत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला आहे. फाेटाेत गॅब्रिएलान पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये बेबीबंप फ्लाॅंट करताना दिसत आहे. यासाेबत अभिनेत्रीने ब्लॅक गाॅगलही लावला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

युजर्सने ग्रॅबएलाला केले ट्राेल
ग्रॅबिएलाला ट्रोल करत एका युजरने लिहिले की, ‘तुझ्यासारखे लोकच लोकांची मानसिकता बिघडवतात.’ अशात यावर प्रतिउत्तर देत ग्रॅबिएला कमेंट करत म्हणाली, ‘होय, ही मानसिकता सुंदर आयुष्य या जगामध्ये आणल्यामुळे खराब झालं.  तुमच्यासारख्या छाेट्या विचारांच्या लोकांमुळे नाही.’

दुसऱ्यांदा आई होणार ग्रॅबिएला
अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड ग्रॅबिएला दुसऱ्यांदा आई होणार आहे. ग्रॅबिएलाने 2019च्या सुरुवातीला पहिल्या मुलाला जन्म दिला होता. तिच्या पहिल्या मुलाचे नाव एरिक आहे. अशात आता वयाच्या 36व्या वर्षी ती दुसऱ्यांदा आई होणार आहे.

अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला यांची प्रेमकहाणी खूप मनोरंजक आहे. ग्रॅबिएला एक मॉडेल आणि अभिनेत्री असून ती दक्षिण आफ्रिकेची रहिवासी आहे. अशात सध्या अर्जुन रामपला आणि ग्रॅबिएला दोघेही त्यांच्या भावी मुलाबद्दल खूप उत्सुक आहेत.(bollywood actor arjun rampal girlfriend gabriella has pregnant second time without marriage see about full report)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलच्या लेकाने बदलले आपले नाव; आता प्रतीक बब्बर नाही तर ‘हे’ असणार नाव
लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो! ‘बाल शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आऊट, महाराष्ट्राचा ‘परश्या’ साकारणार बाल शिवाजी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा