Friday, May 24, 2024

नाद करा पण आमचा कुठं! सोनमने मुलाच्या पाळणाघराची दाखवली खास झलक

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या घरी 20 ऑगस्टला मुलगा वायुचा जन्म झाला. सोनम आणि आनंद दोघांचेही कुटुंब त्यांच्या मुलाच्या जन्मामुळे खूप आनंदी आहे. वायूला सर्व प्रकराच्या सुख सुविधा कुटुंबातील सदस्य उपलब्ध करुन देत आहे. अशातच सोनमने मुलगा वायुच्या पाळणाघराची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. यासोबत तिने या पाळणाघरासाठी अनेकांचे आभार मानले आहेत.

वायू (vayus) याचे पाळणाघर पाहिल्यावर असे वाटते की, ते निसर्गाने प्रेरित आहे. यामध्ये लाकडी फर्निचरचा वापर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये अर्थ कलर्सचा वापर अधिक प्रमाणात करण्यात आला आहे. फोटो पाहून असे म्हणता येईल की, पाळणाघरची जागा खूप सुंदर आणि शांतमयी आहे. सोनमने याला ‘वंडर अँड ब्युटी’ म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

सोनम (sonam kapoor) हिने मुलगा वायुच्या पाळणाघराचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या पाळणाघराच्या बॅकड्रॉपला चारकोल पेंटिंग पाहायला मिळते. सोबतच खेळणी व इतर वस्तू ठेवण्यासाठी पाळणाघरात बरीच जागा आहे. त्याच वेळी, पालकांसाठी पाळणाघरात रॉकिंग चेअर देखील ठेवण्यात आली आहे जेणेकरून ते देखील बाळासह आराम करू शकतील. या पाळणाघरात मुलासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे.

सोनम कपूरने या फोटोंसोबत एक मोठी नाेट लिहिली आहे. यामध्ये तिने या सुंदर पाळणाघरासाठी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार मानले आहेत. तिने पाळणाघरचे डिझाइन आणि क्रिएटिव आर्ट वर्कबद्दल आभार मानले आहेत. सोनम म्हणते की, हे सुंदर पाळणाघर तिला आणि तिची आई सुनीता कपूरला खूप मदत करेल. सोनमच्या म्हणण्यानुसार, या नर्सरीमध्ये तिला पाहिजे ते सर्व आहे. (bollywood actress sonam kapoor shares glimpse of son vayus nursery inspired by nature)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘भारत जोडो यात्रे’मध्ये रितेश देशमुख झाला भवूक, पोस्ट शेअर करत व्यक्त केली भावना

अभिनेत्री बिपाशा बासू अन् करण सिंग ग्रोवरच्या लेकीचं ठरले नाव; सोशल मीडियावर नावाची चर्चा

हे देखील वाचा