Saturday, June 29, 2024

‘तुम्ही सनी देओलसारखे दिसता…’ महाराष्ट्रातील शेतकऱ्याने अभिनेत्याला ओळखलंच नाही, एकदा पाहाच व्हिडिओ

सनी देओल बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘गदर 2‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सनीने एका व्यक्तीला त्याच्या लूकने गोंधळात टाकले आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

खरं तर, अभिनेता सध्या त्याच्या आगामी अॅक्शन-ड्रामा ‘गदर 2’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काल म्हणजेच रविवारी (दि.5 मार्च)ला सनीने महाराष्ट्रातील अहमदनगर येथील त्याच्या शूटिंग शेड्यूलमधील एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये, बैलगाडीवर स्वार झालेला एक गावकरी सनी देओलच्या टीमच्या सदस्याला भेटतो आणि संवाद साधतो. त्यांच्या संवादादरम्यान सनी येतो आणि शेतकऱ्याशी बोलतो. तो एका अभिनेत्याशी बोलतोय हे शेतकऱ्याला माहीत नसते.

शेतकरी सनी देओलशी संभाषण करत असताना त्याला म्हणतो की, ‘तू सनी देओलसारखा दिसतोस.’ यावर अभिनेता हसायला लागतो आणि उत्तरात म्हणताे, ‘हाे मी आहे.’ मग, शेतकऱ्याला धक्का बसतो आणि ताे सनीला न ओळखल्याबद्दल माफी मागताे. यानंतर दोघेही एकमेकांशी मजेने बोलू लागतात. शेतकरी सनीला सांगतो की, “तो त्याचा खूप मोठा चाहता आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

सनी देओलने त्याच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासाेबतच एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये तो शेतकऱ्यासोबत बैलगाडीवर बसलेला दिसत आहे. युजर्स अभिनेत्याच्या या पाेस्टवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अहमदनगरमध्ये गदरच्या शूटिंगदरम्यान.’

2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर एक प्रेम कथा’च्या आठवणी आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘गदर 2’चे मोशन पोस्टर रिलीज केले. आता पुन्हा एकदा सनी आणि अमिषा पटेलची जोडी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सनी आणि अमिषाचा ‘गदर 2’ चित्रपट 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे.(bollywood actress sunny deol had funny conversation with farmer he fails to recognise gadar 2 actor video goes viral on internet)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमधे मित्राला सपोर्ट करण्यासाठी पोहचली ‘मंडळी’, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

धक्कादायक! ए.आर. रहमान यांचा मुलगा अमीन याच्यासोबत मोठा अपघात; 3 दिवसानंतरही गायक शॉकमध्ये

हे देखील वाचा