Sunday, June 23, 2024

अमीषा पटेलने शेअर केला ‘गदर २’चा मुहूर्त शॉट, तारा आणि सकीनाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) २००१ मध्ये आलेला ‘गदर: एक प्रेम कथा’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आता २० वर्षांनंतर या प्रेमकथेची कथा पुन्हा एकदा पुढे नेण्यात येणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलने (Ameesha Patel) सोशल मीडियावर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. शूटिंग सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अमीषा सकीना आणि सनी देओल तारा सिंगच्या लूकमध्ये दिसत आहे. २० वर्षांनंतर दोघेही एकत्र दिसणार आहेत. उत्कर्ष शर्माही या चित्रपटात दिसणार आहे.

दरम्यान, बुधवारी (१ डिसेंबर) अमीषाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या मुहूर्ताचा फोटो शेअर केला आणि माहिती दिली की, ‘गदर’ चित्रपट दुसऱ्या फ्लोरवर आला आहे. सनी आणि अमीषा व्यतिरिक्त या चित्रपटाशी संबंधित सहकलाकार देखील फोटोत दिसत आहेत. फोटोमध्ये अमीषाने केशरी रंगाचा पारंपारिक ड्रेस परिधान केला आहे, तर सनीने केशरी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाच्या पायजामासह पगडी घातलेला दिसत आहे.

हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शन लिहिले की, “गदर २ मुहूर्ताचा शॉट, सुंदर सिंग आणि रोहित या प्रसंगाला शोभा देण्यासाठी तिथे उपस्थित होते.” २००१ मध्ये आलेला ‘गदर’ हा चित्रपट विभाजनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर आधारित आहे. लाहोरमधील एका राजकीय कुटुंबातील मुस्लीम मुलगी तारा सिंग आणि सकीना यांच्याभोवती चित्रपटाची कथा फिरते.

हा बहुप्रतिक्षित चित्रपट अनिल शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनला असून, या चित्रपटाचा सिक्वेल देखील अनिल शर्मांनीच दिग्दर्शित केला आहे. ‘गदर २’ हा सनीच्या ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सिक्वेल असल्याचं म्हटले जात आहे. चित्रपटात भारत-पाकिस्तानचा अँगल पुढे नेण्यात येणार आहे. त्याचवेळी या चित्रपटात त्याच्या मुलाची भूमिका साकारणारा बालकलाकार उत्कर्ष शर्माही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. शक्तिमान लिखित ‘गदर २’ हा चित्रपट अनिल शर्मा दिग्दर्शित करत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जय गंगाजल’च्या ‘त्या’ सीननंतर ढसाढसा रडू लागली होती प्रियांका चोप्रा, मग अभिनेत्याने…

-बोनी कपूर यांची इंस्टाग्रामवर एन्ट्री, मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी इंस्टावर आल्याचे अर्जुन कपूरने म्हणणे

-पोलिस म्हणून सलमान खानला आवडते ‘ही’ खास व्यक्ती; अभिनेत्याने सांगितले काही किस्से

हे देखील वाचा