Sunday, December 8, 2024
Home अन्य ‘द कपिल शर्मा शो’मध्ये जेव्हा धर्मेंद्र आणि सनी देओलमध्ये होते भांडण; पाहून रितेश अन् जेनेलियाही लागले हसू

‘द कपिल शर्मा शो’मध्ये जेव्हा धर्मेंद्र आणि सनी देओलमध्ये होते भांडण; पाहून रितेश अन् जेनेलियाही लागले हसू

आपल्या दिलखुलास अभिनयाने आणि विनोदाने सगळ्यांचे मनोरंजन करून खळखळून हसवणारा शो म्हणजे सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो.’ या शो मधील पात्र त्यांचा अभिनय, कॉमेडी, मिमिक्री या सगळ्यामुळे या शोचे अनेक प्रेक्षक दिवाने आहेत. परंतु या शोमध्ये हास्याचा कल्लोळ तेव्हा झाला जेव्हा कृष्णा अभिषेक हा गरम सिंग बनून आणि किकु शारदा फनी सिंग बनून स्टेजवर आले. स्टेजवर धर्मेंद्र आणि सनी देओल यांची मिमिक्री बघून केवळ प्रेक्षकच नाही, तर शोमध्ये आलेले पाहुणे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे देखील हसून हसून लोटपोट झाले होते.

जेव्हा कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा हे धर्मेंद्र आणि सनी देओल यांच्या गेटअपमध्ये स्टेजवर आले, तेव्हा त्यांना बघूनच सगळेजण खूप हसायला लागले होते. जेव्हा त्यांनी धर्मेंद्र आणि सनी देओलचा अभिनय सुरू केला, तेव्हा मात्र सगळेच जोर जोरात हसायला लागले. पण त्यांचा अभिनय सुरू असताना शोमधील धर्मेंद्र आणि सनी देओलची भांडण झाली. त्यांच्या या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

द कपिल शर्मा या शोमध्ये बॉलिवूड मधील लव्ह बर्ड्स रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे दोघेही पाहूणे म्हणून आले होते. त्या दोघांनीही या शोमध्ये खूप एन्जॉय केला. या शोमध्ये जेनेलिया आणि रितेशने त्यांच्या आयुष्यातील त्यांचे प्रेम, लग्न हा प्रवास शेअर केला. तसेच वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा देखील केला. त्या दोघांच्या नात्याबद्दल आधी कोणालाच कल्पना नव्हती.

त्या दोघांनी ‘तेरी मेरी कसम’ या एकाच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांचा हा चित्रपट फ्लॉप झाला. पण त्यांची जोडी सुपरहिट झाली. तिथून पुढे त्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला. त्यांनी अनेक वर्ष ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. रितेश आणि जेनेलिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रिय असतात. ते त्यांचे व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी जोडून राहत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंटनॅशनल मीडियावर भडकली कंगना रणौत, व्हिडिओ शेअर करून संताप केला व्यक्त

-‘तुम्ही हे खूप चुकीचं करत आहात’, म्हणत रणबीर कपूरने पॅपराजींना चांगलेच सुनावले

-प्रेम हे! विराट कोहलीने गायले होते पत्नी अनुष्का शर्मासाठी ‘हे’ गाणे, अभिनेत्रीचे डोळे आले होते भरून

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा