Saturday, June 29, 2024

सुष्मिताने एक्स बाॅयफ्रेंड रोहमन शॉलला डेट करायला केली सुरुवात? अभिनेत्रीच्या ‘या’ पोस्टने चाहत्यांना दिला इशारा

हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्रीबद्दल बोलायचे झाले, तर त्यात सुष्मिता सेन हिचे नाव नक्कीच येईल. सुष्मिता तिच्या व्यवसायिक आयुष्यासाेबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चांगलीच चर्चेत असते. अशात अलीकडेच एका अवॉर्ड शोदरम्यान सुष्मिता तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत स्पॉट झाली होती. यानंतर आता सुष्मिता सेनने रोहमन शॉलसोबतचा एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. यानंतर चाहत्यांमध्ये रोहमन आणि सुष्मिताच्या पॅच-अपच्या बातम्या चांगल्याच चर्चेत आहेत.

गुरुवारी (दि. 11 मे)ला सुष्मिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी शेअर केली. या स्टाेरीत सुष्मिता (sushmita sen) हिच्यासोबत तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलही (rohman shawl) दिसत आहे. सुष्मितने या फोटोसोबत एक ओळ लिहिली, ज्यामुळे चाहत्यांची उत्कंठा चांगलीच वाढली आहे. खरे तर, सुष्मिताने या इंस्टा स्टोरीत इमोजीसह लिहिले आहे की, ‘छान फोटो रोहमन.’

सुष्मिता आणि राेहमनच्या ब्रेकअपची बातमी खूप पूर्वीच समोर आली होती. यानंतर सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्या डेटिंगच्या बातम्यांनी चांगलाच जोर धरला होता. मात्र, आता पुन्हा एकदा सुष्मिता आणि रोहमन यांच्यातील जवळीक वाढू लागली आहे.

sushmita sen
Photo Courtesy: Instagram/sushmitasen47

सुष्मिता सेनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आगामी काळात अभिनेत्री ‘आर्य 3’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजच्या मागील दोन सीझनमध्ये सुष्मिताने तिच्या अप्रतिम अभिनयाने सर्वांची मने जिंकली. अशात सुष्मिता सेनचा ‘आर्या 3’ ओटीट प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर लवकरच प्रदर्शित होईल.(bollywood actress sushmita sen shares romantic pic with ex boyfriend rohman shawl)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांवर ‘या’ अभिनेत्रीने लावला घृणास्पद आरोप; म्हणाली, ’15 वर्षांपासून लैंगिक शोषण…’
सलग 3 वर्षे ऑडिशनमध्ये अभिनेत्याला नाकारले गेले, ‘या’ चित्रपटाने रातोरात बनवले स्टार

हे देखील वाचा