Friday, July 5, 2024

स्वरा भास्करचे बहुमोल मंगळसूत्र का आहे चर्चेत? ‘या’ संस्कृतीशी आहे विशेष संबंध

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या लग्नाच्या प्रत्येक फंक्शनचा आनंद घेत आहे. काल रात्री म्हणजेच गुरुवारी (16 नाेव्हेंबर)ला स्वरा आणि फहाद अहमद यांनी दिल्लीत रिसेप्शन पार्टीचे आयाेजन केले हाेते. मात्र, या रिसेप्शन पार्टीमध्ये सर्वात जास्त लक्षवेधले ते नववधूच्या मंगळसूत्राने. स्वराचं मंगळसूत्र बॉलीवूड सुंदरींपेक्षा खूप वेगळं दिसत होतं. चला तर मग, अभिनेत्रीने हे अनोखे डिझाईन असलेले मंगळसूत्र का घातले? ते जाणून घेऊया…

स्वरा भास्कर (swara bhaskar) हिने 6 जानेवारी 2023 रोजी फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले होते. यानंतर, 13 मार्च 2023 रोजी दोघांनी कौटुंबिक आणि जवळच्या मित्रांमध्ये तेलगू रितीरिवाजांनुसार लग्न केले. अशात आता या जोडप्याने काल रात्री म्हणजेच गुरुवारी (16 नाेव्हेंबर)ला दिल्लीत एक भव्य रिसेप्शन पार्टी ठेवली, ज्यामध्ये मोठे दिग्गज नेते सहभागी होण्यासाठी आले होते. लव्ह बर्ड्सनी त्यांच्या रिसेप्शन पार्टीसाठी फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेले पोशाख निवडले, ज्यामध्ये दोघेही खूप क्यूट दिसत होते.

स्वराने परिधान केलेल्या लाल रंगाच्या लेहेंग्यावर गोल्डन एम्ब्रॉयडरी आणि क्रिस्टल वर्क होते, ज्यासाेबत लूक पूर्ण करण्यासाठी स्वराने लाल रंगाचा भारी नक्षी असलेला दुपट्टा परिधान केला होता. याशिवाय स्वराने तिच्या दागिन्यांकडे विशेष लक्ष देऊन गळ्यात गुलाबी स्टाेनचा मोत्यांचा हार, मॅचिंग कानातले आणि मांग-टिका घातला होता. अशात दूरवरून चमकणाऱ्या सोन्याच्या मंगळसूत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खरे तर, स्वराने तेलुगू परंपरेचे मंगळसूत्र परिधान केले होते. कारण, तिचे वडील उदय भास्कर आंध्र प्रदेशचे आहेत. यामुळेच अभिनेत्रीने तिच्या लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये तेलुगू परंपरेचे पालन केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

स्वराने परिधान केलेल्या दक्षिण भारतीय मंगळसूत्राला थाली म्हणतात. जी सोन्याची साखळी किंवा पिवळ्या धाग्याने घातली जाते, ज्यामध्ये सोन्याच्या साखळीसह दोन छोटे पेंडेंट जोडले जातात. दुसरीकडे, फहादच्या लूकबद्दल बाेलायचे झाले, तर  त्याने सुंदर कुर्ता परिधान केला होता, ज्यामध्ये ताे प्रचंड देखना दिसत हाेता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

यापूर्वी, स्वराने तिच्या इंस्टाग्रामवर कव्वाली नाईटचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये तिने हिरव्या रंगाचा मखमली सूट परिधान केला हाेता, तर फहादने हिरव्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.(bollywood actress swara bhaskar telugu mangalsutra catch all the limelight at reception party with fahad ahmad)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! इंडियन लाफ्टर चॅलेजमधील ‘या’ प्रसिद्ध कॉमेडीयनवर बलात्काराचा आरोप दाखल

अरे वा! दृश्यम फेम अभिनेत्री लवकरच होणार आई, बेबी बंपसोबतचा व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा