Wednesday, March 29, 2023

स्वरा भास्करने 4 वर्षांनी लहान फहाद अहमदशी केले लग्न, कोण आहे हा राजकीय नेता? वाचा सविस्तर

बॉलिवूडमध्ये आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी टॅलेंटेड अभिनेत्री स्वरा भास्कर विवाहबंधनात अडकली आहे. तिने याच वर्षी 6 जानेवारीला समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले होते. अलीकडेच, अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिची आणि पती फहाद अहमदची संपूर्ण प्रेमकथा सांगताना दिसत आहे. कोण आहे स्वरा भास्करचा नवरा फहाद अहमद? काय करतो? चला जाणून घेऊया…

समाजवादी पक्षाच्या सुशिक्षित नेत्यांपैकी एक आहे फहाद अहमद
फहाद अहमद (Fahad Ahmad) हा महाराष्ट्र आणि मुंबईतील समाजवादी पक्षाच्या युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. फहादने अलीगड मुस्लिम विद्यापीठातून (AMU) शिक्षण घेतले आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये त्यानी एमफिल केले आणि नंतर पीएचडीही केली आहे. ताे समाजवादी पक्षाच्या सर्वात सुशिक्षित नेत्यांपैकी एक मानला जाताे. माध्यमातील वृत्तांनुसार, शिक्षणादरम्यान त्याने राजकारणात प्रवेश केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

स्वरा भास्कर तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकतीच स्वरा भास्कर ‘भारत जोडो यात्रा’मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

स्वराने फहाद अहमदसाेबत लग्न करून सर्वांना केले आश्चर्यचकित
यादरम्यान, सोशल मीडियावर राहुल गांधी आणि स्वरा भास्करचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाेल हाेते, जे पाहून असा अंदाज बांधला जात होता की, स्वरा लवकरच राजकारणात पाऊल टाकेल. मात्र, समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्न करून तिने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.(bollywood actress swara bhasker husband fahad ahmad tied the knot with to political activist in a court wedding on january 6)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भांडं फुटलं रे! स्वरा भास्करने केले समाजवादी पक्षाच्या ‘फहाद अहमद’साेबत लग्न, पाहा व्हिडिओ

‘पठाणमधून पगार आला नाही का?’, दीपिकाला इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना पाहून युजरची कमेंट, Video

हे देखील वाचा