Saturday, March 2, 2024

माेठी बातमी! तापसी पन्नूला लक्ष्मी देवीची प्रतिमा असलेला नेकलेस घालणं पडलं महागात, अभिनेत्रीविराेधात तक्रार दाखल

इंदूरमधील एका संघटनेने अभिनेत्री तापसी पन्नूविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तापसी पन्नूने एका फॅशन शोमध्ये लक्ष्मी देवीची प्रतिमा असलेला हार घालून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप संघटनेने केला आहे. याप्रकरणी छत्रीपुरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सोमवारी (दि. 27 मार्च)ला ही माहिती दिली.

अभिनेत्री तापसी पन्नू (taapsee pannu) विरोधात इंदूरमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. छत्रीपुरा पोलिस स्टेशनचे एसएचओ कपिल शर्मा म्हणाले, “एकलव्य गौडकडून एक अर्ज आला आहे की, तापसी पन्नूने फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करताना लक्ष्मी जीचे लॉकेट घातले होते आणि त्यादरम्यान तिने रिवीलिंग ड्रेस परिधान केला हाेता.”

अर्जदाराचे म्हणणे आहे की, “त्या लॉकेटसोबत रिवलिंग ड्रेस परिधान केल्याने, त्याच्या धार्मिक भावना आणि सनातन धर्माच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. त्यामुळे याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात यावी.” ते म्हणाले, “आम्ही पन्नूविरुद्धच्या तक्रारीची चौकशी करत आहोत. अद्याप याबाबत काेणतीही एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. चौकशीअंती याप्रकरणी योग्य ती पावले उचलली जातील.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

मंडळी, आम्ही तुम्हाला सांगतो की, तापसी पन्नूने अलीकडेच लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक दरम्यान असा हार घातला होता, ज्यामुळे ती सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात ट्रोल झाली. अनेक युजर्सनी तिच्या या ड्रेसिंग सेन्ससह देवाची मूर्तीयुक्त हार परिधान केल्याने आक्षेप घेतला आहे.

तापसी पन्नूच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर तिने अनेक दमदार चित्रपटात काम केले आहे, ज्यामध्ये ‘जुडवा2’, ‘थप्पड’, ‘पिंक’ बदला यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.(hindu organisations complaint against bollywood actress taapsee pannu for wear revealing dress with devi lakshmi necklace)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खळबळजनक! अजून एका लोकप्रिय अभिनेत्रीने संपवले जीवन, अभिनयासोबतच गायनातही होती कुशल
‘करण-अर्जुन’ सिनेमासाठी सलमान खान नाही तर ‘हा’ सुपरस्टार होता पहिली पसंत, राकेश रोशन यांचा खुलासा

हे देखील वाचा