Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अरे देवा! चक्क चालण्याच्या स्टाईलवरुन देखील ‘या’ अभिनेत्रींना केले गेले ट्रोल, पाहा कोण कोण आहे यादीत

सिने जगतातील सिने अभिनेत्री प्रत्येकवेळी कोणत्या ना  कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात. त्यांच्या कपड्यांची, व्हिडिओंची आणि फोटोंची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. यामुळे त्या अभिनेत्री अनेकदा ट्रोलही होताना दिसत असतात. मात्र बॉलिवूड जगतात अशाही अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या चालण्याच्या स्टाईलमुळे चर्चेत येत असतात. बऱ्याच अभिनेत्रींना त्यांच्या चालण्याच्या स्टाईलमुळेही नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. कोणत्या आहेत त्या अभिनेत्री चला जाणून घेऊ. 

तमन्ना भाटिया 

या यादीतील पहिले नाव तमन्ना भाटियाचे आहे. तिने अलीकडेच Amazon प्राइम व्हिडिओच्या भव्य लाँच कार्यक्रमात हजेरी लावली होती जिथे तिची आगामी वेब सिरीज ‘जी करदा’ ची घोषित करण्यात आली होती. इव्हेंटमध्ये तमन्नाने ब्लू कलरचा लेटेक्स ड्रेस घातला होता आणि त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. मात्र, तिच्या चालण्याच्या स्टाईलवरुन ट्रोल करण्यात आले होते. कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता, ज्यात नेटकऱ्यांनी तिला घातलेल्या हिल्समुळे ट्रोल केले होते.

काजोल

‘तान्हाजी’ फेम अभिनेत्री काजोलला एकदा विमानतळावर वेगाने चालल्यामुळे ट्रोल करण्यात आले होते. पापाराझींनी अपलोड केलेल्या या व्हिडिओच्या खाली नेटिझन्सनी खूप विचित्र कमेंट केल्या होत्या.

मलायका अरोरा

मलायका अरोरा अनेकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येत असते. मग ते तिच्या फॅशन सेन्ससाठी असो किंवा तिच्या फिटनेसमुळे असो. मलाइका तिच्या चालण्याच्या स्टाईलवरुन ट्रोल झाली आहे. तिच्या या चालीला नेटकऱ्यांनी ‘डक’ वॉक असे संबोधले.

नोरा फतेही-

नोरा फतेही ही इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. नोरा तिच्या स्टायलिश लुक्ससाठी ओळखली जाते. सध्या ती एका रिअलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. तिने एका एपिसोडसाठी जबरदस्त बॉडीकॉन ब्लू गाऊन घातला होता, त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. पण नोराला या ड्रेसमध्ये व्यवस्थित चालता येत नव्हते, त्यामुळे तिने तिच्या असिस्टंटची मदत घेतली. याच गोष्टीसाठी नेटिझन्सनी तिला वाईटरित्या ट्रोल करण्यास सुरुवात केली.

शनाया कपूर

लॅक्मे फॅशन वीकमध्ये शनाया कपूरने पहिल्यांदा मनीष मल्होत्रासाठी रॅम्प वॉक केला. तिच्या या चालीमुळे नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले. बॉलीवूडच्या अभिनेत्रीने किमान रॅम्प चालायला शिकले पाहिजे, असे नेटकऱ्यांचे म्हणणे होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा