Saturday, April 18, 2026
Home बॉलीवूड आईला आठवून भावुक झाला संजय दत्त, म्हणाला ‘माझ्या जीवनाचा आधार आणि माझ्या…’

आईला आठवून भावुक झाला संजय दत्त, म्हणाला ‘माझ्या जीवनाचा आधार आणि माझ्या…’

आज भारतीय सिनेसृष्टीतील अतिशय सुंदर आणि दिग्गज अभिनेत्री असलेल्या नर्गिस दत्त यांची पुण्यतिथी. ३ मे १९८१ साली कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले. नर्गिस यांनी बॉलिवूडमध्ये त्यांच्या अभिनयाने अक्षरशः लोकांना वेड लावले होते. निखळ सौंदर्य आणि जिवंत अभिनय या दोन गोष्टींवर त्यांनी बॉलिवूडमध्ये राज्य केले. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी प्रत्येक व्यक्ती त्यांना आठवत आहे. सोशल मीडियावर देखील त्यांच्या आठवणी त्यांचे फोटो शेअर केले जात आहे. अशा वेळेस त्यांचा मुलगा आणि अभिनेता संजय दत्त देखील कसा मागे राहील. संजय दत्तने देखील नर्गिस यांच्या फोटोचे कोलाज शेअर करत अतिशय भावनिक संदेश लिहिला आहे.

संजय दत्तने नर्गिस यांच्या चार सुंदर फोटोंचे कोलाज शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “असा एकही क्षण जात नाही जेव्हा तुझी आठवण येत नाही माँ. माँ तू माझ्या जीवनाचा आधार आणि माझ्या आत्म्याची शक्ती होती. काश माझी पत्नी आणि मुलं तुला भेटू शकले असते तर तू तुझे भरपूर प्रेम आणि आशीर्वाद त्यांना दिला असता. मला आज आणि प्रत्येक दिवशीच तुझी आठवण येत असते.” संजय दत्तची ही पोस्ट खूपच कमी वेळात व्हायरल झाली आणि त्यावर सामान्य लोकांसोबतच कलाकारांनी देखील कमेंट्स करत त्यांची श्रद्धांजली वाहिली आहे.

संजय दत्त हा नेहमीच त्याच्या आईच्या खूपच जवळ होता. आईच्या जाण्याचे त्याला मोठे दुःख झाले होते. बरोबर त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या चार दिवस आधीच नर्गिस यांनी या जगाचा निरोप घेतला होता. नर्गिस दत्त यांनी १९३५ साली ‘तलाश-ए-हक’ सिनेमातून बालकलकर म्हणून काम करत बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मुख्य भूमिका साकारत अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा