Monday, July 15, 2024

अपघाताच्या धक्क्यातून अजूनही सावरली नाही मलायका अरोरा वाचा तिचे हेल्थ अपडेट

प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराच्या (Malaika Arora) अपघाताच्या बातमीने हिंदी चित्रपट जगतात चांगलीच खळबळ माजली आहे. २ एप्रिल २०२२ अभिनेत्री मलायका अरोराचा मुंबई- बॅंगलोर दुद्रगती महामार्गावर प्रवासादरम्यान अपघात झाला होता. यावेळी गाडीत मलायका अरोरासोबत तिचा ड्रायव्हर आणि बॉडिगार्ड होता. अपघातात मलायकाला दुखापत झाली होती ज्यामुळे तिला तात्काळ मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता मलायकाच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. 

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, अभिनेत्री मलायका अरोरा २ एप्रिलला मुंबई खोपोली एक्सप्रेस हायवेवर अपघात झाला होता. २ एप्रिलच्या गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळेच महामार्गावर राज्यभरातुन येणाऱ्या कार्यकर्यांच्या गाड्यांची गर्दी झाली होती. यावेळी आपल्या रेंजरोवर गाडीने प्रवास करत असलेल्या मलायकाचा खालापूर टोलनाक्याजवळ अपघात झाला होता. यावेळी मलायकाच्या गाडीला स्विफ्ट गाडीने धडक दिली होती यामध्ये मनसैंनिकांच्या बसचाही समावेश होता. या गंभीर अपघातात मलायकाला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला तात्काळ मुंबईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आता मलायकाच्या प्रकृतीबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, या अपघाताने मलायकाला मानसिक धक्का बसला असुन ती अजुनही या धक्क्यातून सावरलेली नाही. या अपघातात तिला दुखापत झाली असून त्यावर उपचार करुन रुग्णालयाने डिस्चार्ज दिला आहे. मलायकाच्या प्रकृतीबाबत तिच्या बहिणीने अमृता अरोराने खुलासा केला असून तिला आरामाची गरज असल्याची माहिती दिली आहे. या गंभीर अपघातात मलायकाच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात मलायकाने कोणतीही तक्रार दाखल केली नसली तरी या घटनेचा पोलिस तपास होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा