तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर रोज काही नवे खुलासे होत आहेत. कधी शीजन घरचे जेवण मागतोय तर कधी निर्दोष बोलला जात आहे. अशातच काल म्हणजे शनिवारी (दि. 31 डिसेंबर)ला शीझान खानला न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्याच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली. शनिवारी रात्री शीजनच्या वकिलाने सांगितले होते की, त्याची सीक्रेट गर्लफ्रेंड आहे की बॉयफ्रेंड, याबद्दल ताे आज खुलासा करणार आहे. शीजनच्या वकिलाने तुनिषाचे मामा पवन शर्मा यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
एका संभाषणात शीजन (sheezan khan) याच्या वकिलाने सांगितले की, त्याची अट न्यायालयाने मान्य केली आहे. एवढेच नाही तर शीजानच्या वकिलाने तुनिषाचे मामा पवन शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय पोलिसांकडे कोणतेही ठोस पुरावे नसताना त्यांनी दबावाखाली शीजान मोहम्मदला अटक केली असे शीजनच्या वकिलाचे म्हणणे आहे. याशिवाय त्यांनी एफआयआरमध्येही अनेक त्रुटी नोंदवल्या आहेत.
शीजनच्या वकिलाचे म्हणणे आहे की, “मीडिया ट्रायलच्या दबावाखाली शीजनला अटक करण्यात आली आहे.” याशिवाय वकिलाने तुनिषाच्या मामावरही गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, “पवन शर्मा हा तुनिषाचा खरा मामा नाही. तुनिषाच्या कुटुंबाशी त्याचा काहीही संबंध नाही. त्यांनी संपूर्ण तपासाची दिशाभूल केली आहे.”
शीजनचे वकील पुढे म्हणाले, “शीजनची मानसिक स्थिती काय आहे हे तुम्ही किंवा मी समजू शकणार नाही. तीन दिवसांपूर्वी त्या तुरुंगात एकाने आत्महत्या केली होती, त्यामुळेच आम्ही सुद्धा काउंसलिंगची डिमांड केली आहे.” ते आपाला मुद्दा पुढे करत म्हणाले, “शीजनला एकटे सोडू नये. शीजन अशा स्थितीत आहे की, तो आत्महत्येसारखे पाऊलही उचलू शकतो” असेही शीजनच्या वकिलाचे म्हणणे आहे.(bollywood actress tunisha sharma death case lawyer says sheezan khan mental condition is not good he can attempt suicide)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वय 48, पण फिगर विशीतल्या अभिनेत्रीसारखा; कपूर घराण्याच्या पोरीने वाढवले सोशल मीडियाचे तापमान
‘बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करणाऱ्या उर्फीवर कायदेशीर कारवाई करा’, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे निवेदन