Friday, January 27, 2023

‘बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करणाऱ्या उर्फीवर कायदेशीर कारवाई करा’, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे निवेदन

उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. कधी उर्फीच्या फॅशन सेन्सचे कौतुक केले जाते, तर कधी तिला तिच्या कपड्यावरुन ट्राेल केले जाते. अशातच उर्फी पुन्हा एकदा वादाच्या घेऱ्यात अडकली आहे, ज्यामुळे तिला तिच्या बाेल्ड लूक मुळे टार्गेट केले जात आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेत्या चेत्रा किशोर वाघ (chitra wagh) यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत उर्फी जावेद (urfi javed) हिच्यावर निशाणा साधला आहे. चेत्रा किशोर यांनी आपल्या पोस्टमध्ये उर्फीविरोधात संताप व्यक्त करत पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हिडिओमध्ये उर्फी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. किशाेर वाघ यांनी ट्विट करत लिहिले, “अहो मुंबईत काय चालले आहे.” रस्त्यावर सार्वजनिक नग्नता सक्रियपणे दाखवणाऱ्या या महिलेसाठी मुंबई पोलिसांकडे आयपीसी किंवा सीआरपीसी कलमे आहेत की नाही. महिलाही तिला सपाेर्ट करत करत आहेत. उर्फीला बेड्या ठाेकल्या पाहिजे.”

चित्रा किशाेर वाघच्या या ट्विटला उर्फी जावेदनेही उत्तर दिले आहे. उर्फीने लिहिले की, “तुझ्यासारख्या महिला माझ्या विषयावरून लोकांना वळवते. ज्या महिलांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी आर वास्तव्यात का काहीच करत नाही? स्त्रीशिक्षण आणि बलात्काराची लाखो प्रकरणे प्रलंबित आहेत? तू हे मुद्दे का मांडत नाहीस?” उर्फीने असे मत मांडल्यानंतर आज (दि. 1 जानेवारी)ला चेत्रा यांनी आणखी एक ट्विट केले, ज्यामध्ये त्यांनी उर्फीवर “मुंबईच्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत” असल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर उर्फीच्या अटकेची मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

मात्र, उर्फी जावेदसोबत असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही उर्फीला तिच्या कपड्यांमुळे टिकेला समाेर जावे लागले आहे, पण प्रत्येकवेळी उर्फीने चाेख उत्तर देऊन सर्वांची ताेंड बंद केली आहे. उर्फीने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले होते, परंतु ‘बिग बॉस ओटीटी’चा भाग झाल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झाेत्यात आली. त्याचबरोबर आता ती ‘स्प्लिट्सविला’च्या लेटेस्ट सीझनमध्ये दिसणार आहे.(bjp leader chitra wagh demands actre`s`s urfi javed arrest for going topless on mumbai streets actress gave reply)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
टीव्हीवरील ‘या’ प्रसिद्ध मालिकांचे नाव ठरवले होते ‘या’ बॉलिवूड गाण्यांवरु

‘त्याच जुन्या बायका…’, प्रसिद्ध दिग्दर्शकाने नवीन वर्षाच्या दिल्या विचित्र शुभेच्छा; वाचून शॉकच बसेल

हे देखील वाचा