76व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. यामध्ये ऐश्वर्या राय बच्चनपासून सारा अली खान, ईशा गुप्ता, मानुषी छिल्लर आणि उर्वशी रौतेलापर्यंत सर्व सेलिब्रिटींचे रेड कार्पेट लूक पाहायला मिळाले. अशात सध्या कान्समधून उर्वशीचा सातव्या दिवसातील तिसरा लूक समाेर आला आहे, ज्याला पाहून अनेक चाहते तिची प्रशंसा करत आहेत, तर काही लोक तिला ट्रोल करत आहेत. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…
सोमवारी म्हणजेच (दि. 22 मे)ला कान्सच्या रेड कार्पेटवरून उर्वशी रौतेला (urvashi rautela) हिचा तिसरा लूक समोर आला. यादरम्यान तिने हिरव्या रंगाचा हेवी फेदर गाऊन परिधान केला हाेता. या गाऊनच्या आजूबाजूला हिरव्या रंगाची पिसे लावली हाेती आणि यासोबत उर्वशीने चांदीचे दागिने देखील कॅरी केली हाेते. महत्वाचे म्हणजे हा ड्रेस डिझायनर झियाद नाकदच्या स्प्रिंग समर 2023 कॉउचर कलेक्शनमधील आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर एकिकडे उर्वशीच्या चाहत्यांना तिचा हा लूक आवडला आहे, तर दुसरीकडे अनेक लोक तिला प्रचंड ट्रोल करतानाही दिसत आहेत. काही लाेक तिची तुलना पोकेमॉनशी करत आहे, तर काही तिला पोपट म्हणताना दिसत आहेत. अशात एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘मला विश्वास बसत नाही की, उर्वशी असे कपडे घालू शकते. ती जटायूसारखी दिसत आहे.’
View this post on Instagram
मंडळी, उर्वशीने 2022 मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले होते. यावर्षी ती दुसऱ्यांदा रेड कार्पेटवर दिसली. यंदा 16 मे ते 27 मे दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे.(bollywood actress urvashi rautela feathered look now surfaced after green lipstick user said totaa banakar kahan chali )
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“बारामतीत काकांनी हात बाजूला केला तर…” राज ठाकरेंनी लगावला अवधूत गुप्तेच्या शोमध्ये अजित पवारांना टोला
ओळखलं का मंडळी? फोटोमध्ये दिसणाऱ्या गोड मुलीला, सोज्वळ सौंदर्याने मराठी सिनेसृष्टीला लावले आहे वेड