Wednesday, July 3, 2024

उर्वशी रौतेलाचा जिममधील व्हिडिओ व्हायरल, तिचा रफ अँड टफ व्यायाम पाहूनच सर्वांना फुटेल घाम

आपले आवडते कलाकार आपण जेव्हा बघतो तेव्हा त्यांच्याबद्दल, त्यांच्या सौंदर्याबद्दल, आपल्याला खूपच हेवा वाटतो. अभिनेत्रींचा कमनीय बांधा आणि अभिनेत्यांची भारदस्त बॉडी पाहून भलेभले त्यांच्या प्रेमात पडतात. मात्र त्यांच्या या उत्तम शरीरामागे कलाकार खूप मेहनत घेतात आणि त्याच मेहनतीचे फळ म्हणजे कलाकारांचे आकर्षक शरीर. कलाकार त्यांचे हे शरीर कमवण्यासाठी जिममध्ये खूप मेहनत घेतात आणि अनेक तास घाम गळतात. कलाकारांचे जिममधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशीच एक फिटनेस फिक्र आणि उत्तम फिगर असलेली अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला.

अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या चित्रपटांमधील अभिनयासाठी कमी परंतु तिच्या स्टाईल आणि फिटनेससाठी जास्त ओळखली जाते. उर्वशी ही चित्रपटसृष्टीतील तंदुरुस्त आणि मोहक अभिनेत्रींपैकी एक आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तिचे सुंदर सौंदर्य कोणालाही तिच्याकडे बघताच क्षणी प्रेमात पाडेल असे आहे. सोशल मीडियावर उर्वशीचे प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावर तिचे प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो. सध्या उर्वशीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. ज्यात ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे.

उर्वशीचे सौंदर्य पाहून अनेक चाहते तिचे प्रचंड कौतुक करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबद्दल बोलायचे झाले, तर वर्कआउट करताना उर्वशी ब्लॅक जेगिंग आणि क्रॉप टॉपमध्ये सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये उर्वशी तिच्या खांद्याचा आणि हातांचा व्यायाम करताना दिसत आहे. उर्वशी तिच्या फिटनेससाठी किती मेहनत घेते याचा अंदाज तुम्हाला हा व्हिडिओ पाहून येईलच. या व्हिडिओमध्ये तिचे लवचिक शरीरसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर ती जियो स्टूडियोजच्या ‘इंस्पेक्टर अविनाश’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. यात ती रणदीप हुडासोबत मुख्य भूमिका साकारत आहे. शिवाय ती ‘ब्लॅक रोझ ‘ आणि ‘ थिरुटू पायले २’च्या हिंदी रिमेक मध्ये दिसणार आहे . नुकतीच उर्वशी गुरु रंधावासोबत त्याच्या ‘ डूब गये ‘ या गाण्यात दिसली होती . या गाण्याला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला . तर लवकरच उर्वशी दक्षिण सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपट ‘पुष्पा’ मध्ये आयटम साँग करताना दिसू शकते.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा भारताबद्दल परदेशी होस्टने ऐश्वर्याला विचारला ‘हा’ प्रश्न; अभिनेत्रीनेही दिले होते सडेतोड प्रत्युत्तर

-‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण

-तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन

 

हे देखील वाचा