बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांमध्ये कमी आणि सोशल मीडियावर जास्त सक्रिय दिसते. अलीकडेच, क्रिकेटर ऋषभ पंतच्या अपघातानंतरही, अभिनेत्री सतत काहीतरी पोस्ट करत होती, ज्यामुळे युजर्स देखील आश्चर्यचकित झाले होते. दरम्यान, उर्वशीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेलाचा अनाेखा अंदाज पाहायला मिळत आहे, व्हिडिओमध्ये ती ब्युटी मास्क घालून रस्त्यावर चालताना दिसत आहे, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…
उर्वशी रौतेला(urvashi rautela) हिचा एक व्हिडिओ पॅपराझींने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे, ज्यामध्ये ती चेहऱ्यावर ब्युटी मास्क लावून रस्त्याच्या मधोमध फिरत आहे. यासाेबतच अभिनेत्रीने सनग्लासेस देखील लावले हाेते, ज्यामध्ये ती पोझ देत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ पाहून साेशल मीडिया युजर्स अभिनेत्रीला माेठ्या प्रमाणात ट्राेल करत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्रीच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले की, ‘ये बोखलाई औरत है.’, तर एका युजरने लिहिले की, ‘हळदीचा समारंभ चालू आहे का? अशात एका युजरने लिहिले की, ‘कदाचित दीदीकडे पैसे नसेल म्हणून पार्लरमधून पळून गेली.’ अशाप्रकारे चाहते अभिनेत्रीच्या व्हिडिओवर भन्नाट कमेंट करत आहेत.
View this post on Instagram
उर्वशी राैतैलाच्या अभिनय काराकीर्द विषयी बाेलयचे झाले, तर तिने ‘सनम रे’, ‘हेट स्टाेरी 4’, ‘पागलपंती’, ‘भाग जाॅनी’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे.(bollywood actress urvashi rautela walks out in beauty mask on her face and poses in sunglasses users troll actress calling ugly watch viral video)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
16 वर्ष व्यक्तिरेखा जगल्यानंतर जेव्हा अमोल कोल्हे यांना सांगितले गेले की तुमचा आवाज…
धक्कादायक! बिग बॉस फेम ‘या’ मराठमोळ्या कलाकाराला देखील आला होता कास्टिंग काऊचचा विदारक अनुभव