Thursday, April 18, 2024

मोठमोठ्या लोकांवर विनोद करणाऱ्या कपिल शर्माला मुलीची ‘ती’ मागणी ऐकून फुटला होता घाम, वाचा तो किस्सा

कॉमेडीच्या जगाचा बेताज बादशहा म्हणून सर्वात आधी नाव येते ते कपिल शर्माचे. मोठ्या मेहनतीने आणि कष्टाने त्याने छोट्या शहरातून येत एवढे मोठे यश संपादन केले आहे. आज तो त्याच्या टेलीव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा शो’च्या निमित्ताने लोकांना खळखळून हसवण्याचा काम करतो. याच शोमध्ये नुकत्याच झालेल्या एका भागात त्याने त्याच्या कुटुंबद्दल सांगितले. तो म्हणाला त्याची मुलगी अनायरा तीन वर्षाची असून देशील तिच्या खूपच जास्त मागण्या असतात. तिच्या एका अशाच मागणीचा एक किस्सा देखील त्याने यावेळी सर्वांना सांगितला.

कपिल म्हणाला, “एकदा तिने कार्तिक आर्यनला टीव्हीवर डान्स करताना पहिले आणि त्याच्याशी बोलण्याचा हट्ट धरला. तिला असे वाटते की, संपूर्ण जग टीव्हीमध्ये आहे, आणि सर्वांची एकमेकांशी ओळख आहे. तिने टीव्हीवर कार्तिकला पहिले आणि माझ्याजवळ आली आणि म्हणाली, पप्पा कार्तिक डान्स करतोय. तो आपल्या घरी का नाही येत. जेव्हा मी याबद्दल कार्तिकशी बोललो तेव्हा त्याने व्हिडिओ कॉल केला आणि तो अनायराशी बोलला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

पुढे कपिल शर्मा म्हणाला, “कार्तिकशी बोलून झाल्यानंतर आता तिला पेपा पिगसोबत बोलायचे. हे अनायरा चे आवडते कार्टून कॅरेक्टर आहे. तिला पेपा पिग सोबत बोलण्याचा हट्ट तिने सोडला नाही, मग गिन्नीने तिच्याशी वेगळ्या आवाजात बोलणे केले, मात्र त्यानंतर आता तिला व्हिडिओ कॉलवर पेपा पिगशी बोलायचे आहे.” त्याचे हे बोलणे एकुण आलेल्या सर्व पाहुण्यांसह अर्चना पुरण सिंग आणि तिथे असलेले प्रेक्षक खळखळून हसत होते.

दरम्यान कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांनी २०१८ साली लग्न केले. त्यानंतर २०१९ साली ते अनायराचे आईबाबा झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

“ती चित्रपटात येते नाचते, मार खाऊन…” कंगना रणौतबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ‘या’ अभिनेत्याचे उत्तर आले चर्चेत

उत्कृष्ट अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून ओळख मिळवणारी श्रिया पिळगावकर आहे ओटीटीवरील लोकप्रिय अभिनेत्री

हे देखील वाचा