Thursday, February 22, 2024

त्रस्त होऊन बॉलिवूड सोडायला निघालेली यामी गौतम; म्हणाली, ‘या स्टेजला पोहोचले हाेते की…’

यामी गौतम ही बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. यामीने आपल्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामीने ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘बाला’, ‘विकी डोनर’, ‘काबिल’ आणि ‘बदलापूर’ यासारख्या चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयासाठी प्रशंसा मिळवली आहे. मात्र, एक वेळ अशी हाेती जेव्हा यामीने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. काय आहे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊया…

यामीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ‘तिला असे वाटू लागले हाेते की, सिनेसृष्टीत फक्त दिसण्याला महत्त्व दिले जाते.’ ती पुढे म्हणाली,  मला कोणत्याही व्यक्तीबद्दलचा राग नाही, मी फक्त माझा दृष्टिकोन मांडत आहे. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला अशा भावना येतात. अवॉर्ड फंक्शन्स प्रमाणेच हेही चालते, एखाद्या अभिनेत्याप्रमाणे तुम्हाला असे वाटते की, अरे यार, मलाही त्या मुलाखतीत हजर राहायला हवे होते,परंतु तुम्हाला तिथं बाेलवलं जात नाही. आता भलेही मला बाेलावलं जात असलं तरी मी त्यावेळेबाबत सांगत आहे, ज्यावेळी माझे सुरुवातीचे दिवस हाेते.”

संवादादरम्यान यामीने सांगितले की, “कधी कधी हिट्सच्या यादीत आपलं नाव न आल्यानं खटकतं. मात्र, आता मी एक सुरक्षित व्यक्ती आहे, पण एक काळ असा होता, जेव्हा हे सर्व खूप वेदनादायक असायचे. खरं तर, तुम्ही स्टार आहात असं वातावरण तुमच्या आजूबाजूला निर्माण होतं. फोटो क्लिक करण्यासाठी पॅपराझी असतात, तुम्हाला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची गर्दी असेत, संपूर्ण पीआर टीम असते, पण मुळात प्रेक्षकांना काहीही फरक पडत नाही तुम्ही काय आहात त्यांना फक्त शेवटी एक चांगला चित्रपट बघायचा असतो.”

यामी पुढे म्हणाली, “मला फक्त चांगले काम करायचे आहे. ‘बाला’ चित्रपटासाठी नॉमिनेट न झाल्याने मी खूप नाराज झाली होती. तोपर्यंत मी या टप्प्यावर आली होती की, आता मी कोणताही चित्रपट करणार नाही. मला इंडस्ट्री सोडायची आहे.” यामीचे म्हणणे आहे की, ‘चांगले काम करूनही तिला ती ओळख मिळत नव्हती. त्यामुळे तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला हाेता.’ यामी आपला मुद्दा पुढे करत म्हणाली, “मला अभिनयाची खूप आवड आहे, पण याचा अर्थ असा नाही की, दुसरे काही होऊ शकत नाही. मी तयार होती. माझी आई पण म्हणाली होती की, ठीक आहे, ये, काहीही झाले तरी चांगली झोप लागली पाहिजे. कठोर परिश्रम करा, परंतु प्रत्येक गोष्टीचे फळ चांगलेच मिळेल असे नाही.” असे यामीने मुलाखतीदरम्यान सांगितले.(bollywood actress yami gautam reveals she wanted to quit film industry talks about career lows unfair treatment?)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
करिश्माच्या कतिलाना अदाने चाहत्यांना पडली भुरळ, फोटो गॅलरी तुमच्यासाठी

मलायका अन् अर्जुनचं ब्रेकअप झालंय का? पार्टीत एकमेकांपासून अंतर बाळगल्यामुळे चाहत्यांना पडलेत प्रश्न

हे देखील वाचा