खरंय भाऊ, प्रेमाला नसतंय वयाचं बंधन.! ‘या’ अभिनेत्रींनी केलं कमी वयाच्या नायकांसोबत ‘लग्न’, एका जोडीत तर १२ वर्षांचं अंतर


प्रेमाला वय नसतं, प्रेम आंधळं असतं अशी वाक्ये आपण प्रेमी युगुलांमध्ये नेहमीच ऐकायला मिळतात. याचा प्रत्यय आपल्याला बॉलिवूड मध्येही येतो. बॉलिवूड मध्ये अशा काही नायिका आहेत ज्यांचे पती हे त्यांच्या पेक्षा वयाने लहान आहेत, नव्हे काहींचे तर खूपच लहान आहेत. कोण आहेत अशा अभिनेत्री एक नजर टाकूयात.

१. ऐश्वर्या रॉय-बच्चन
बॉलिवूडमधील सर्वात चर्चित विवाह सोहळा जर कुणाचा झाला असेल तर तो ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचा. ऐश्वर्या तिच्या करियरच्या शिखरावर असताना अभिषेक ने तिला प्रपोज केलं होतं आणि तिनेसुद्धा त्याला होकार दिला होता. २००७ मध्ये या दोघांनीही लग्न केलं होतं. अभिषेक हा ऐश्वर्या पेक्षा दोन वर्षांनी लहान असून दोघांना आराध्या नावाची लेकदेखील आहे.

२. फराह खान
बॉलिवूडमध्ये सुरुवातीला कोरिओग्राफर आणि आता दिग्दर्शक म्हणून नाव मिळवलेल्या फराह खान ने वयाच्या 39 व्या वर्षी स्वतःपेक्षा आठ वर्षे लहान शिरीष कुंदर शी लग्न केलं. लग्नाआधी शिरीष आणि फराह यांनी बऱ्याच सिनेमांमध्ये एकत्र काम देखील केलं होतं. शिरीष हा पेश्याने फिल्म एडिटर आहे.

३. सोहा अली खान
अभिनेत्री शर्मिला टागोरची मुलगी तसेंच अभिनेता सैफ अली खान ची बहीण सोहा अली खान हि सिनेमांमध्ये तिच्या अभिनयाची जादू काही दाखवू शकली नाही. सोहा ने सुद्धा तिच्यातून पाच वर्षे लहान असलेल्या कुणाल खेमुशी विवाहबद्ध झाली. लग्नानंतर या दोघांनाही एक गोंडस अशी मुलगी देखील झाली आहे.

४. प्रीती झिंटा
बॉलीवुडमधली प्रीटी गर्ल प्रीती झिंटा २००० च्या दशकात खूप गाजलेली पाहायला मिळाली. दिल से, वीर झारा, दिल है तुम्हारा, कभी अलविदा ना कहना सारख्या अनेक सुपरहिट सिनेमांमधून ती रुपेरी पडद्यावर झळकली आहे. या शिवाय इंडियन प्रीमियर लीग मधील किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाची ती सहमालकीण देखील आहे. अशा या प्रीती ने तिच्या पेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या तिच्या अमेरिकन बॉयफ्रेंडशी म्हणजेच जीन गुडइनफ याच्यासोबत विवाह केला.

५. बिपाशा बासू
बॉलिवूडची ब्लॅक ब्युटी असणारी हॉरर गर्ल बिपाशा बसू हिने सुद्धा मोठ्या पडद्यावर खूप नाव कमावलं. अजनबी, आत्मा, अलोन, राझ, धूम २ अशा अनेक सिनेमांमधून झळकली. तिचे अधिकतर सिनेमे हे हॉरर आहेत. अशा या बिपाशा ने अलोन चित्रपटातील तिचा सहकलाकार करण सिंह ग्रोव्हर याच्याशी लग्नगाठ बांधली. करण हा बिपाशापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे.

६. प्रियांका चोप्रा
देसी गर्ल प्रियांका ने मिस वर्ल्ड हा खिताब जिंकला आणि तिच्यासाठी बॉलिवूडची दारं खुली झाली. तितक्याच यशस्वी पद्धतीने तिने संधीचं सोनं देखील केलं. मुझसे शादी करोगी, ओह गॉड तुस्सी ग्रेट हो, बाजीराव मस्तानी, दोस्ताना अशा अनेक हिंदी सिनेमांमधून ती मोठ्या पडद्यावर झळकली आहे. यानंतर तिने हॉलिवूड मध्ये तीच नशीब आजमावलं आणि तिथे देखील यशस्वी ठरली. आशा या प्रियांकाने तिच्यापेक्षा जवळपास दहा वर्षांनी लहान असलेल्या हॉलिवूड कलाकार, गायक निक जोनस बरोबर आपली लगीनगाठ बांधली.

७. अमृता सिंह
ऐंशी आणि नव्वदीच्या दशकात लाखो तरुणांच्या हृदयावर राज्य करणारी अमृता सिंह आठवतेय. जिने खुदगर्ज, नाम, बेताब, मर्द, चमेली की शादी, आईना असे अनेक हिट चित्रपट दिले. तिने त्याकाळी तिच्यापेक्षा तब्बल १२ वर्षे लहान असणाऱ्या सैफ अली खान याच्याशी विवाह करून सम्पूर्ण बी टाऊनला आश्चर्याचा धक्का दिला होता. सैफ आणि अमृता यांचा आता घटस्फोट झाला असून दोघेही आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत. दोघांनाही सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन अपत्ये देखील आहेत. तर सैफ ने काही वर्षांपूर्वी करीना कपूर सोबत वेगळा संसार थाटला होता.


Leave A Reply

Your email address will not be published.