Tuesday, July 9, 2024

दिपिका ते बिपाशा, या अभिनेत्रींबरोबरही घडल्यात आत्याचाराच्या घटना

आपण नेहमीच आत्याचार, विनयभंग झाल्याच्या बातम्या ऐकत असतो, पाहात असतो. रोज भारतात अशा घटना घडतात. त्यावर रागही व्यक्त करतो आणि निषेधही करतो. पण अशा घटना केवळ सामान्य व्यक्तींबरोबरच होतात असे नाही, तर काही अभिनेत्रीही आहेत, ज्यांना अशा प्रकारच्या त्रासातून जावे लागले आहे. त्यांनी याबद्दल खुलेपणाने भाष्यही केले आहे… या व्हिडिओतूनही आपणही अशा बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊ ज्या विनयभंग किंवा लैंगिक शोषणाच्या बळी ठरल्यात.

सध्या बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक दिपिका पदुकोन आहे. पण तिलाही छेडछाडीच्या प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. याबद्दल तिनेच एका मुलाखतीत खुलासा केला होता. तिने सांगितले होते, ‘ती 14-15 वर्षांची असताना तिच्या कुटुंबाबरोबर रस्त्यावर चालत जात असताना एका अनोखळी व्यक्तीने तिला चुकिच्या पद्धतीने स्पर्श केला होता. त्यावेळी तिने त्याला भररस्त्यात त्याला कानाखालीही मारलेली.

दिपीकाप्रमाणेच सोनम कपूरबरोबरही अशी घटना घडली आहे. ती केवळ त्यावेळी 13 वर्षांची होती. एकदा मुंबईतील एका थेअटरमध्ये गेलेली असताना एका व्यक्तीने तिच्या छातीला चूकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. त्यावेळी ती लहान असल्याने घाबरलेली आणि तिला त्यावेळी काही न समजल्याने ती रडायला लागलेली. याबद्दल तिनेच खुलासा केला होता.

सुश्मिता सेनही या यादीत आहे. तिलाही विनयभंगाच्या प्रकाराला सामोरे जावे लागले होते, तेही एका 15 वर्षाच्या मुलाकडून. अनेक रिपोर्ट्सनुसार एका ऍवॉर्ड फंक्शनमध्ये 15 वर्षाच्या मुलाने सुश्मिता सेनबरोबर गैरव्यवहार केला होता. त्यावेळी तिनेही त्या मुलाला माफ न करता त्याच्या मानेला पकडून पब्लिकमध्ये आणून त्याला सुनावले होते.

बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींमध्ये जिचे नाव घेतले जात ती अभिनेत्री म्हणजे बिपाशा बासू. काही वर्षांपूर्वी तिचे जॉन अब्रहमबरोबर नावही जोडलेले होते. पण एकदा त्याच्याचबरोबर जिस्म चित्रपटाचे प्रमोशन करायला मुंबईतील एका नाईटक्लबमध्ये गेली असताना एका अनोळखी व्यक्तीने तिची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. अनेक रिपोर्ट्सनुसार त्या व्यक्तीने पळून जायचा प्रयत्न केला, पण जॉनने त्याचा चांगलाच क्लास घेतलेला.

याशिवाय ये जवानी है दिवानीमधील आदीतीची भूमिकेला अविस्मरणीय बनवणारी अभिनेत्री म्हणजे कल्की कोचिलिन हिलाही भयानक अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. याबद्दल तिनेच माहिती दिलेली की ती ९ वर्षांची असताना ती लैंगिक शोषणाला बळी पडली होती.

दंगल चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेली झायरा वासिम हिला तर दिल्ली ते मुंबई फ्लाईटमध्ये विनयभंगाच्या प्रकाराला सामोरे जावे लागले होते. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की ती अर्धझोपेत असताना एका व्यक्तीने पायाने तिला चूकीच्या पद्धतीने स्पर्श केलेला. दंगल चित्रपटातच काम केलेल्या फातिमा सना शेख ही देखील ती केवळ ३ वर्षांची असताना लैंगिक शोषणाची बळी ठरलेली.

या यादीत स्वरा भास्करचेही नाव आहे. प्रेम रतन धन पायो या चित्रपटाच्या शूटदरम्यान राजकोटच्या एयरपोर्टवर तिच्याशी छेडछाडीचा प्रकार झाला होता. अनेक रिपोर्टनुसार त्यावेळी अनुपम खैर यांनी तिला त्यातून बाहेर यायला मदत केली होती.

तर मंडळी यावरून समजतं की केवळ सामन्यच नाही, तर सेलिब्रेटीही अशा दुर्दैवी घटनांचे बळी ठरले आहेत. तुमचे याबद्दल काय मत आहे, हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दैनिक बोंबाबोंबला फॉलो करायला विसरू नका…(bollywood actresses who were sexually abused)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा मध्यरात्री गुंडांनी केला होता पाठलाग, अभिनेत्री बिपाशा बसूने सांगितला जिवावर बेतलेला प्रसंग

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या बिपाशाचा मार्ग नव्हता सोपा, पैशांची बचत म्हणून करायची 10 रुपयांत जेवण

हे देखील वाचा