Saturday, June 29, 2024

साराशी ब्रेकअप झाल्यानंतर कार्तिक आर्यनने केला लव्हलाईफचा खुलासा; म्हणाला, ‘मी मागील एक वर्षापासून…’

बॉलिवूडमध्ये सध्या नवीन पिढीतील कलाकारांची चांगलीच चर्चा सुरू आहे. त्या कलाकारांमध्ये कार्तिक आर्यन याचाही समावेश होतो. कार्तिकने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. खूप कमी वेळात कार्तिकने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. आता तो तरुण पिढीचा आवडता अभिनेता बनला आहे. बॉलिवूडमध्ये नवखा असूनही बाकीच्या नवीन कलाकारांमध्ये कार्तिक आर्यनची चाहत्यांमध्ये जास्त क्रेझ पाहायला मिळत आहे.

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आपल्या ‘भूल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa) या चित्रपटामुळे खूपच चर्चेत आला आहे. त्याचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्याने तो प्रेक्षकांचा आवडता अभिनेता बनला आहे. काही दिवसांपूर्वी गणेश चतुर्थी असल्याने तो बाप्पाचे दर्शन घेत असताना देखील दिसला होता. कार्तिकला बॉलिवूडचा ‘हँडसम हंक’ देखील बोलले जाते. त्याचा लूक पाहून खूप मुलींचा तो क्रश बनला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचे नाव सारा अली खान (Sara Ali Khan) हिच्यासोबत जोडले गेले होते. ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ते दोघे ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकत्र आले होते, पण शूटिंग संपल्यानंतर त्याच्या ब्रेकअपच्या चर्चा समोर आल्या आणि अभिनेत्याने आपल्या संपलेल्या नात्याबद्दल खुलासा केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक याने एका मुलाखतीदरम्यान सारा आणि त्याच्या नात्याबद्दल वेगळे झाल्याचे कारण सांगितले होते की, “आता मी सिंगल आहे.” सारा आणि कार्तिकच्या नात्याची सुरुवात ‘कॉफी विद करण’ या कार्यक्रमाद्वारे झाली होती. या रियॅलिटी शोमध्ये साराने सांगितले होते की, “मला कार्तिक आर्यनला डेट करायचे आहे.” त्यानंतर हे दोघे ‘लव आज कल’ या चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि एकमेकांना डेट करू लागले. त्यांनी या नात्याला लपवण्याचे खूप प्रयत्न केले, पण शेवटी कॅमेऱ्याने त्यांना सोडले नाही आणि सत्य बाहेर आले. यानंतर दोघांनीही आपल्या ब्रेकअप झाल्याची कबूली दिली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्याला विचारले गेले होते की, त्याच्या आणि साराच्या रिलेशनशिपबद्दल खोटे वक्तव्य का केले? याचे उत्तर देताना कार्तिक फार काही बोलला नाही. त्याने फक्त एवढेच सांगितले की, “मी 1.25 वर्षांपासून सिंगलच आहे आणि याच्याव्यतिरिक्य मला अजून काहीच माहीत नाही.” यानंतर त्याला विचारले गेले की, तू एवढं परफेक्ट कसं काय सांगू शकतो? यावर तो लाजतो आणि नंतर वक्तव्यात बदल करून सांगतो की, “मी 1 वर्षापासून सिंगल आहे.”

कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर त्याचा शेवटचा चित्रपट ‘भूल भुलैय्या 2’ ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमवला होता. तो सध्या ‘शहजादा’ या आगामी  चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यासोबतच ‘फ्रेडी’ आणि ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामध्ये देखील तो दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राजीवने शालीन अन् टीनाच्या लवस्टाेरीवर साधला निशाना; म्हणाला, ‘बिग बॉस ऐवजी टीव्ही सीरियल’
बाबाे! असं काय घडलं की, नेहा आणि आयुष्यमानला सिंगिंग रिऍलिटी शोमधून हाकलण्यात आले?

हे देखील वाचा