Tuesday, May 28, 2024

बाबाे! असं काय घडलं की, नेहा आणि आयुष्यमानला सिंगिंग रिऍलिटी शोमधून हाकलण्यात आले?

अभिनेता आयुष्मान खुराना आज बॉलिवूडमधील टॉप कलाकारांपैकी एक आहे, पण त्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. एक चांगला अभिनेता असण्यासोबतच आयुष्मान एक चांगला गायक देखील आहे. अलीकडेच, आयुष्मान खुराना, त्याचा सहकलाकार जयदीप अहलावत साेबत सोनी टीव्हीच्या सिंगिंग रिऍलिटी शो ‘इंडियन आयडॉल 13‘ मध्ये दिसला, जिथे त्याने स्पर्धकांसोबत त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या अनेक गोष्टी शेअर केल्या. यादरम्यान त्याने ‘इंडियन आयडॉल’ या सिंगिंग रिऍलिटी शोशी संबंधित असा एक किस्सा शेअर केला, जो ऐकून सगळेच थक्क झाले.

सोनी टीव्हीने अलीकडेच त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि जयदीप अहलावत (Jaideep Ahlawat) यांचा शनिवार (दि. 19 नाेव्हेंबर)चा विशेष भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये जजेज साेबत बोलताना अभिनेता सांगत आहे की, “त्याने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात इंडियन आयडॉल 13 साठी ऑडिशन दिले होते.” आयुष्मान खुराना म्हणाला, “इंडियन आयडॉलमध्ये मला आणि नेहाला एकाच वेळी नाकारण्यात आले होते. मुंबई ते दिल्ली या ट्रेनमध्ये आम्ही एकत्र प्रवास केला. आम्ही एकूण 50 लोक होतो आणि आम्हा सर्वाना नाकारण्यात आले.” आयुष्मान पुढे म्हणाला, “नेहा आज या पोजीशनवर आहे आणि मी येथे आहे, त्यामुळे हे आयुष्या आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.”

आयुष्मान खुरानाने 2004 साली रोडीजमधून आपल्या करिअरची सुरुवात केली, त्यानंतर त्याने अनेक शोचे होस्ट म्हणून काम केले. 2012 मध्ये, शूजित सरकारच्या ‘विकी डोनर’ या चित्रपटाद्वारे त्याला इंडस्ट्रीत आपली अभिनय प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळाली. पहिल्याच चित्रपटापासून आयुष्मान खुरानाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. या चित्रपटानंतर, अभिनेत्याने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि ‘ड्रीम गर्ल’, ‘बधाई हो’, ‘अंधाधुन’ आणि ‘शुभ मंगल ‍सावधान’ सारखे चित्रपट दिले. आज त्याची गणना बॉलिवूडमधील टॉप कलाकारांमध्ये केली जाते. ‘डॉक्टर जी’ नंतर आयुष्मान खुराना लवकरच ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो’मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये तो नायकाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 2 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना पहिल्यांदाच अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. तर या चित्रपटात जयदीप अहलावत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.(tv ayushmann khurrana remember the time when him and neha kakkar rejected in indian idol audition watch video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खळबळजनक! महानायकांच्या घराचा सुरक्षा घेरा तोडून घुसला अज्ञात व्यक्ती, पुढं…

‘गैंग्स ऑफ वासेपुर’ फेम डेफनिटवर आरोप, रांची पोलिस्टेशनमध्ये गुन्हा दाखल

हे देखील वाचा