Saturday, September 7, 2024
Home टेलिव्हिजन राजीवने शालीन अन् टीनाच्या लवस्टाेरीवर साधला निशाना; म्हणाला, ‘बिग बॉस ऐवजी टीव्ही सीरियल’

राजीवने शालीन अन् टीनाच्या लवस्टाेरीवर साधला निशाना; म्हणाला, ‘बिग बॉस ऐवजी टीव्ही सीरियल’

छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय शाे ‘बिग बॉस 16’मध्ये  यावेळी अनेक जोडपी तयार झाली असली तरी ती सर्व चाहत्यांना प्रभावित करण्यात अपयशी ठरली. मग ते गौतम विज आणि सौंदर्या शर्मा यांची जोडी असो किंवा शालिन भानोत आणि टीना दत्ता. आता ‘बिग बॉस 15’ फेम राजीव अडातिया यांनीही बिग बॉस 16 च्या घरात सुरू असलेल्या एका लवस्टाेरी प्रतिक्रिया दिली आहे. ती लवस्टाेरी दुसऱ्या कुणाची नसून शालीन भानोत आणि टीना दत्ताची आहे, त्यावर प्रतिक्रिया देत राजीवने एक ट्विट केले आहे. 

आपल्या ट्विटमध्ये टीना दत्ता (tina datta) आणि शालीन भानोट (shalin bhanot) यांच्यातील संबंधांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना राजीव (rajiv) म्हणाला की, “बिग बॉसच्या घरात येण्याऐवजी त्यांनी डेली सोपवर सही करावी.” त्याने या दोघांमधील नात्याला ‘बनावट आणि कंटाळवाणे’ म्हटले आहे. राजीवचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे. राजीवच्या या ट्विटवर अनेक यूजर्सनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राजीवने ट्विट करत लिहिले, “शालीन आणि टीना दोघांनी बिग बॉस ऐवजी टीव्ही सीरियल साइन करायला हवी होती! कारण ते बिग बॉसला टीव्ही सीरियलमध्ये रुपांतरीत करत आहेत आणि शोची संकल्पनाच उद्ध्वस्त करत आहेत! बिग बाॅस 16 खरोखर कंटाळवाणे होत आहे!! जर ते खरे असते तर मनोरंजक असेल, परंतु ते खूप खोटे आहे!!!!”

याआधी, बिग बॉस 16 मधून बाहेर काढण्यात आलेल्या श्रीजीता डे हिने देखील टीना दत्ता आणि शालीन भानोट यांच्या लव एंगलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. टीना-शालीनचा लव एंगल केवळ खेळासाठी आहे का, असा प्रश्न त्यांनी केला. श्रीजिताने दोघांनाही खेळ बदलण्यास सांगितले होते आणि ट्विट करून खळबळ उडवून दिली होती.

तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले हाेते की, “टीना आणि शालीन यांनी नॉमिनेट हाेताच पुन्हा त्यांच्या क्रिंजी लव स्टोरी ला कॅश करायला सुरुवात केली आहे. आम्ही हे आधी पाहिले नाही का? प्रेक्षक मूर्ख आहेत यावर त्यांचा खरोखर विश्वास आहे का? कंटाळवाणे, आणखी वास्तविक काहीतरी विचार करा.” (tv bigg boss 16 rajiv adatia takes a dig at tina datta and shalin bhanot love story says it is fake and boring)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘टीनाला दाखवावं लागेल तिचं स्टेटस’, सुंबूल-शालीनच्या नात्यावर ‘इमली’च्या वडिलांचं मोठं वक्तव्य
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! एव्हलिन शर्माने वाढदिवसानिमित्त एका वर्षानंतर दाखवला लेकीचा चेहेरा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा