बॉलिवूड लोकप्रिय अमिषा पटेल(Amisha Patel) सिनेेसृष्टीपासून दूरच आहे. एखाद्या चित्रपटात छोट्यामोठ्या भूमिकेत ती दिसते. अलीकडेच अमिषा पटेल पाकिस्तानी अभिनेता इम्रान अब्बास(Imran Abbas) याच्या प्रेमात पडल्याच्या बातम्या पसरायला लागल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरूनच प्रेमाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. पण आता अभिनेत्रीने यावरचे मौन सोडलेय.
अमिषा पाकिस्तानी अभिनेता इमरान अब्बासला डेट करत असल्याचे चर्चा रंंगली आहे. एका मुलाखती दरम्यान अमिषाला इमरानबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ती म्हणाली, ‘मी देखील माझ्या अफेअरच्या चर्चा ऐकल्या आहेत. मला हसायला आले होते. या सर्व अफवा आहेत. मी इतक्या वर्षांनंतर माझ्या मित्राला भेटले. आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा तसेच भेटतो.’
View this post on Instagram
अमिषा आणि इम्रान दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखतात. दोघेही अमेरिकेच्या एका विद्यापीठात एकत्र शिकले होते. विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतरही ते एकमेकांच्या संपर्कात होते. एका इवेंट दरम्यान बहरीनमध्ये अमिषा आणि इमरान यांची भेट झाली. दोघांनी एकत्र व्हिडीओ शूट केला होता. या व्हिडीओमध्ये क्रांती चित्रपटातील दिल में दर्द सा जगा हे गाणे ऐकू येत आहे.
अमिषाने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यानंतर त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.पुढे अमिषा म्हणाली, ‘ते गाणे इमरानचे आवडते गाणे होते. आम्ही अगदी सहज त्याच्यावर परफॉर्म केले. तो व्हिडीओ एका मित्राने रेकॉर्ड केला होता. तो व्हिडीओ खूप क्यूट होता. त्यामुळे आम्ही दोघांनीही तो पोस्ट केला. आम्ही दोघे एकमेकांना खूप आधी पासून ओळखतो. यूएस यूनिवर्सिटीमध्ये आम्ही एकत्र शिक्षण घेत होतो. माझे पाकिस्तानमधील बरेच मित्र आहेत. अब्बास तिकडच्या इंडस्ट्रीमधील अभिनेता आहे.’
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हिजाब विरोधी वाद पेटला! लोकप्रिय गायिकेने थेट मंचावरचं कापले केस
‘मला फसवण्यात आले आहे…’, राज कुंद्राने लिहले पंतप्रधानांना पत्र, सीबीआय चौकशीची केली मागणी
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात बदनामी झाली, प्रतिमा सुधारण्यासाठी जॅकलीनने सुरु केली नवीन मोहिम