Thursday, July 18, 2024

सर्वोच्च न्यायालयाकडून अमिषा पटेलला मोठा दिलासा, कोट्यवधींच्या फसवणुकीचा होता आरोप

अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) हिला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अमिषावर फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हेगारी आरोप आहे. झारखंडमधील कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणी समन्स बजावले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने अमिषा पटेलविरुद्धच्या फौजदारी कारवाईला स्थगिती दिली आहे.

अभिनेत्रीने 5 मे 2022 रोजी याचिका दाखल केली होती, ज्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती बीआर गवई आणि पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने झारखंड सरकारला नोटीस बजावली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले
निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम १३८ (चेक बाऊन्स) अंतर्गत कारवाई कायद्यानुसारच केली जावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सुनावणीत म्हटले आहे. भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम ४०६ (गुन्हेगारी भंग) आणि ४२० (फसवणूक) अंतर्गत केवळ नोटीस जारी करा, असे न्यायालयाने म्हटले. पुढील आदेशापर्यंत, आयपीसीच्या कलम ४०६ आणि ४२० अंतर्गत फौजदारी कारवाईला स्थगिती दिली जाईल.

निर्मात्याने तक्रार केली होती
निर्माते अजय कुमार सिंह यांनी अमिषा पटेल विरोधात तक्रार दाखल केली होती. ज्यावर ट्रायल कोर्टाने भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४२०, ३४ आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत दखल घेतली. अजय कुमार सिंह यांच्या तक्रारीनुसार, ‘देसी मॅजिक’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी अमिषा पटेलच्या खात्यात २.५ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. अमिषाने आश्वासनाप्रमाणे चित्रपटाची पुढील प्रक्रिया केली नाही आणि पैसेही परत केले नव्हते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विल स्मिथची झापड अजूनही विसरला नाही ख्रिस रॉक! घेतला मोठा निर्णय, घडणार का अनर्थ?
धक्कादायक! आईसाठी औषधे घेऊन जात असताना अभिनेत्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात घेतोय उपचार
‘या’ नावाने ओळखला जाणार अनिल कपूरांचा नातू; व्हिडिओद्वारे झाला खुलासा

हे देखील वाचा