Wednesday, July 3, 2024

‘या’ बॉलीवूड कलाकाराचा विमान अपघातात झाला होता मृत्यू, पाहा यादी…..

विमान प्रवास कोणाला आवडत नाही? सर्वसामान्यांपासून खास लोकांपर्यंत सर्वांनाच विमानाने प्रवास करायला आवडते. पण कधी कधी विमान प्रवास देखील लोकांसाठी शेवटचा प्रवास ठरतो. अशा अपघातांनी अनेकवेळा चित्रपट कलाकारांचे प्राणही घेतले आहेत. चला तर मग अशाच काही कलाकाऱ्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे आयुष्य एका विमान अपघातात संपले.

इंदर ठाकूर
‘नदिया के पार’ हा चित्रपट सर्वांनाच आठवत असेल. त्या चित्रपटात चंदर म्हणजेच सचिनचा मोठा भाऊ ओंकारची भूमिका करणारा अभिनेता इंदर ठाकूर(Inder Thakur) विमान अपघाताचा बळी ठरला. त्यांच्यासोबत या अपघातात सुमारे ३२९ लोकांचा मृत्यू झाला. माध्यमांच्या वृत्तानुसार, विमान शीख अतिरेक्यांनी गडबडले होते. हा नियोजित हल्ला होता. नंतर २००३ मध्ये एका संशयित आरोपीला दोषी ठरवण्यात आले.

सौंदर्या
अमिताभ बच्चन स्टारर सूर्यवंशममध्ये हिरा ठाकूरच्या पत्नीची भूमिका साकारणारी सौंदर्या तिच्या चित्रपटांमुळे प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. १७ एप्रिल २००४ रोजी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी सौंदर्या (soundarya) हेलिकॉप्टरने करीमनगरला जात असताना हेलिकॉप्टरला अपघात झाला. माध्यमाच्या वृत्तानुसार, सौंदर्यासह तिचा भाऊ आणि इतर दोन लोकांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, अपघाताच्या वेळी ती दोन महिन्यांची गर्भवती होती.

तरुणी सचदेव
रसना गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या तरुणी सचदेव (Taruni Sachdev)हिचे वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी विमान अपघातात निधन झाले. रसनासोबत त्यांनी अनेक जाहिराती केल्या आहेत. यासोबतच तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘पा’ या चित्रपटातही काम केले होते.

जो लारा
२ ऑक्टोबर १९६२ रोजी जन्मलेल्या जो लारा हिने १९९० मध्ये टार्झन टीव्ही मालिकेद्वारे प्रसिद्धी मिळवली. टारझन नावाने तो खूप प्रसिद्ध झाला, पण काही काळानंतर जोचा त्याच्या पत्नीसह विमान अपघातात मृत्यू झाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

स्पर्धकापेक्षा त्याच्या गर्लफ्रेंडचीच जास्त चर्चा, बिग बी ही झाले आश्चर्यचकित

फक्त लालसिंग चड्ढाचं नव्हे, आमिर खानचे ‘हे’ चित्रपट पाहूनही होईल पश्चाताप

काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर संतापले अनुपम खेर; म्हणाले, ‘गेल्या ३० वर्षांपासून…’

हे देखील वाचा