Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड पहिलाच चित्रपट ठरला हिट, तर पुढे तिन्ही खानसोबत काम करायची मिळवली तिने सुवर्णसंधी; वाचा अनुष्का शर्माचा यशस्वी जीवनप्रवास

पहिलाच चित्रपट ठरला हिट, तर पुढे तिन्ही खानसोबत काम करायची मिळवली तिने सुवर्णसंधी; वाचा अनुष्का शर्माचा यशस्वी जीवनप्रवास

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने कमी काळात स्वत:चे विशेष स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अनुष्का शर्माचे (Anushka sharma) नाव आवर्जुन घेतले जाते. तिची गणना बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये होते. तिने २००८ पासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. अनुष्का शनिवारी (१ मे) आपला ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी, आपण तिच्या कारकीर्दीशी आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊयात. चला तर मग सुरुवात करुया…

अनुष्का शर्माचा अनुष्का शर्माचा जन्म १ मे, १९८८ रोजी जन्म उत्तर प्रदेशमधील फैजाबाद जिल्ह्यातील अयोध्या येथे झाला होता. तिचे सुरुवातीचे शिक्षण कर्नाटकच्या बंगळुरु येथे झाले. यानंतर, ती आपल्या कारकीर्दीसाठी मायानगरी मुंबईकडे वळाली. मात्र, अनुष्काला आपली कारकीर्द घडवण्यासाठी जास्त त्रास सहन करण्याची गरज पडली नाही. तिने मॉडेलिंगपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

साल २००७ मध्ये, अनुष्काने लॅक्मे फॅशन वीकमध्ये वेंडेल रॉड्रिग्सच्या लेस व्हॅम्प्स शोमध्ये, रॉड्रिग्सच्या स्प्रिंग समर ०७ कलेक्शनसाठी रॅम्प वॉक केला होता. यानंतर अनुष्का अनेक जाहिरातींमध्ये दिसली. अनुष्काने तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीला अवघे एक वर्ष दिले, त्यानंतरच तिला बॉलिवूडमध्ये बिग बजेट चित्रपटासह लाँच केले गेले.

अनुष्कानेही दीपिका पदुकोण प्रमाणेच किंग खानसोबत बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. २००८ मध्ये तिने यशराज फिल्म्सच्या, आगामी ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. या ऑडिशनमध्ये अनुष्का यशस्वी ठरली आणि यशराज फिल्म्ससोबत तीन-चित्रपटाचा करार केला. २००८ साली तिने शाहरुख खानसोबत ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटापासूनच अनुष्का शर्माने आपली फॅन फॉलोविंग तयार केली होती. यानंतर, तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.

किंग खान अर्थात शाहरुख खानसोबत पदार्पणानंतर, अनुष्काने इंडस्ट्रीच्या तिन्ही खानसोबत काम केले. जी स्वतःमध्येच एक मोठी गोष्ट आहे. शाहरुखसोबत पदार्पणानंतर, अनुष्का सलमान खानसह ‘सुलतान’ आणि आमिर खानसोबत ‘पीके’ मध्ये दिसली होती. अनुष्काने तिच्या कारकिर्दीला केवळ अभिनयापुरते मर्यादित ठेवले नाही, तर तिने ‘एनएच १०’, ‘फिल्लौरी’, ‘परी’ आणि ‘बुलबुल’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

अनुष्का शर्माच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाले, तर तिचे नाव जानेवारी २०१४ पासूनच क्रिकेटपटू विराट कोहलीशी जोडले जाऊ लागले होते. कित्येक प्रसंगी त्यांना एकत्र स्पॉटदेखील केले जायचे. मात्र, अनुष्का आणि विराटने त्यांच्या नात्याबाबत कधीही उघडपणे खुलासा केला नव्हता. तीन वर्षांच्या नात्यानंतर या जोडप्याने ११ डिसेंबर, २०१७ रोजी इटलीच्या लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाला जवळपास तीन वर्षे झाल्यानंतर अनुष्का आणि विराट पालक झाले आहेत. जानेवारी २०२१ मध्ये अनुष्काने मुलगी वामिकाला जन्म दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा