×

चित्रपट साइन करण्यापूर्वी विचित्र मागणी करतात ‘हे’ कलाकार; एक तर म्हणते, ‘माझ्या असिस्टंटसोबत…’

बॉलिवूडचं जग खूप विचित्र आहे. इथला एखादा कलाकार जेव्हा फिल्मसिटीमध्ये पाऊल ठेवतो, तेव्हा त्याला या विश्वानुसारच पुढं जावं लागतं. पण जेव्हा ती व्यक्ती मोठे नाव म्हणून उदयास येते, तेव्हा हे विश्व त्याच्या पावलावर पाऊल ठेवू लागतं. होय, पूर्वी जे कलाकार इतरांच्या सांगण्यावरून चित्रपट मिळवण्यासाठी कष्ट घ्यायचे, आज तेच कलाकार त्यांच्या अटींनुसार मोठे चित्रपट साईन करतात. अक्षय कुमारपासून सलमान खानपर्यंत आणि करीना कपूर खानपासून ते कंगना रणौतपर्यंत, चित्रपट साइन करण्यापूर्वी हे स्टार्स निर्मात्यांसमोर स्वतःच्या अटींची यादी ठेवतात. जाणून घेऊया की, चित्रपट साइन करण्यापूर्वी कोणते स्टार काय अट ठेवतात.

सलमान खान (Salman Khan)
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानबद्दल सांगायचे झाले तर, तो जेव्हाही एखादा चित्रपट साईन करतो तेव्हा एक अट समोर मांडतो. तो कोणत्याही सीनमध्ये नायिकेसोबत इंटिमेट सीन करणार नाही आणि ऑन-स्क्रीन किस करणार नाही, असे त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आधीच लिहिलेले असते. (weird demands made by bollywood celebs before signing a film)

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

अक्षय कुमार (Akshay Kumar) 
वक्तशीरपणामध्ये काटेकोर असणारा अक्षय कुमार त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये, रविवारी १ दिवसाची सुट्टी नक्कीच घेतो. जेणेकरून तो आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवू शकेल.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

करीना कपूर (Kareena Kapoor)
करीना कपूरची एक विलक्षण मागणी आहे. अभिनेत्रीच्या अटीनुसार, तिच्या चित्रपटांमध्ये फक्त बॉलिवूडचे ए-लिस्ट स्टार्सच तिच्या विरुद्ध भूमिका करतील.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

कंगना रणौत (Kangana Ranaut)

View this post on Instagram

A post shared by Kangana Dhaakad (@kanganaranaut)

 

या बाबतीत कंगना रणौत नेहमीच मागेच राहते. कारण कंगनाचे असे म्हणणे आहे की, तुम्हाला कोणत्याही विषयावर बोलायचे असेल, तर तिच्या पर्सनल असिस्टंटशी बोला. कारण तिची मॅनेजरच निर्मात्यांसमोर अटींची यादी ठेवते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post