×

रेपचा आरोप असलेल्या विजय बाबूवर आणखी एका महिलेने लावला ‘हा’ हैराण करणारा आरोप, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

महिला सहकाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या मल्याळम अभिनेता-निर्माता विजय बाबूवर (Vijay Babu) शुक्रवारी (३० एप्रिल) आणखी एका महिलेने आरोप लावले आहेत. यावेळी एका महिलेने अभिनेत्यावर तिला बळजबरीने किस केल्याचा आरोप केला आहे. वुमन अगेन्स्ट सेक्शुअल हरॅसमेंट या फेसबुक पेजवर महिलेने हा आरोप केला आहे. तिने या फेसबुक पेजवर दावा केला आहे की, ती पहिल्यांदाच विजय बाबूला भेटली होती. त्यानंतर त्याने जबरदस्तीने तिला किस करण्याचा प्रयत्न केला. आरोप करणाऱ्या महिलेच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण नोव्हेंबर २०२१चे आहे.

महिला सहकाऱ्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी विजय बाबूविरोधात गुन्हा दाखल केला, मात्र त्यानंतर अभिनेता बेपत्ता झाला होता. या प्रकरणी कोची पोलिसांनी गुरुवारी (२९ एप्रिल) अभिनेत्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली होती. नंतर फेसबुक लाइव्हदरम्यान विजयवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचे नाव उघड केल्याप्रकरणीही विजयविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (vijay babu case another woman accuses malayalam actor vijay babu of sexual misconduct)

विजयवर नवा आरोप तेव्हा झाला, जेव्हा अभिनेत्याने केरळ उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. विजयने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, महिला त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्याचे आणि त्या महिलेचे चॅट संदेशांसह सर्व पुरावे त्याच्याकडे आहेत आणि ते न्यायालयासमोर सादर करण्यासही तयार असल्याचे अभिनेत्याने सांगितले.

विजय देशातून पळून गेला असून, तो सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एर्नाकुलममधील कोझिकोड येथील एका महिला सहकाऱ्याने तक्रार दाखल केल्यानंतर बाबू फरार झाला आहे. कोची येथील फ्लॅटमध्ये त्याने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार आणि मारहाण केली. तर महिलेकडून २२ एप्रिल रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती.

ही बातमी समोर आल्यानंतर लगेचच विजय बुधवारी त्याच्या सोशल मीडिया हँडलवर लाइव्ह आला आणि दावा केला की या प्रकरणात तो खरा बळी ठरला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post